छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो ‘बिग बॉस’ हा शो यंदा प्लॅटफॉर्म बदलणार आहे. यंदा ‘बिस बॉस’चा सीजन १५ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यानंतर तो टीव्हीवर प्रदर्शित होइल. या सीजनमध्ये बरचं काही बदललं आहेत. या बदलेल्या पद्धतीत काय नवीन आहे?, कोण कोणते कलाकार स्पर्धक म्हणून दिसणार आहेत? असे बरेच प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.
काही दिवसांपूर्वी सलमान खानने ‘बिग बॉस’च्या नवीन सीजनचा प्रोमो रिलीज केला होता. त्यानंतर ‘बिग बॉस’ ओटीटी व्हर्जनचं सूत्रसंचालन करण जोहर करणार असल्याचं त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर सांगितलं. आता ‘बिग बॉस १५’मध्ये कोण कोणत्या कलाकार बघायला मिळणार आहेत? यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता लागली. बऱ्याच कलाकारांची नावे समोर आली आहेत. या नावांच्या यादीत एका नावाची चर्चा मात्र जोमात सुरू आहे.
View this post on Instagram
असे सांगितले जात आहे की ‘बिग बॉस’च्या सीजन १५ मध्ये पहिल्या सारखी आम जनता पण स्हभागी होणार आहे. कलाकारांच्या यादीत देखील प्रसिद्ध अभिनेता, सूत्रसंचालक आणि ‘खतरों के खिलाडी’ चा स्पर्धक अर्जुन बिजलानीच्या नावाची चर्चा सध्या जोमात सुरू आहे. ‘ई-टाइम्स’ने दिलेल्या वृतानुसार अर्जुन बिजलानीचं नाव फायनल करण्यात आलं आहे.
View this post on Instagram
अर्जुन बीजलानी सध्या कलर्सवरील स्टंटबेस शो ‘खतरों के खिलाडी १२’मध्ये दिसत आहे आणि आता ‘बिग बॉस’ सीजन १५ साठी त्याचं नाव कन्फर्म झालं असून त्याचे फॅन्स सुद्धा त्याला या शो मध्ये बघण्यासाठी उत्सुक आहेत.