बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्या जोडीने आजवर अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांची मनं जिकंली आहेत. ‘तेजाब’, ‘राम लखन’, ‘जमाई राजा’, ते ‘पुकार’ अशा अनेक सिनेमांमधील अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. माधुरी दीक्षित सध्या ‘डान्स दीवाने’ या शोमध्ये जजच्या भूमिकेत स्पर्धकांना प्रोस्ताहन देताना दिसतेय. या आठवड्यात या शोमध्ये अनिल कपूर आणि रोहित शेट्टी गेस्ट म्हणून हजेरी लावणार आहेत.
या शोमध्ये आलेल्या अनिल कपूरने चांगलीच धमाल केली आणि स्पर्धकांचे परफॉर्मन्स एन्जॉय केले. मात्र जेव्हा मंचावर माधुरी दीक्षित अनिल कपूरला ‘आय लव्ह यू’ म्हणाली आणि त्यानंतर अनिल कपूर तर आनंदाच्या भरात नाचू लागला. या शोमधील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
View this post on Instagram
‘डान्स दीवाने’च्या मंचावर अनिल कपूरने त्याचं सुपरहिट गाणं ‘आय लव्ह यू’ वर माधुरीसोबत डान्स केला. यावेळी डान्स करत असतानाच माधुरीने अनिल कपूरला ‘आय लव्ह यू’ म्हंटलं. यावेळी अनिल कपूर स्टेजवर उड्या मारत नाचू लागला. यावेळी मंचावरील सर्वांनीच टाळ्या वाजवल्या. या डान्समध्ये पुन्हा एकदा माधुरी आणि अनिलची केमिस्ट्री पाहायला मिळाली.
याशिवया रोहित शेट्टीने देखील ‘डान्स दीवाने’ या शोमध्ये हजेरी लावली होती. स्पर्धकांचे दमदार परफॉर्मन्सेस पाहून यावेळी रोहित थक्क झाला.