बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नोराचे लाखो चाहते आहेत. ती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नोरा फतेहीला बॉलिवूडमधील आघाडीची डान्सर म्हणून ओळखले जाते. तिला डान्सव्यतिरिक्त ग्लॅमरस आणि बोल्ड लूकसाठीही ओळखले जाते. नुकतंच नोरा फतेहीचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत नोरा ही चक्क लावणी करताना दिसत आहे.

सध्या नोरा फतेही ही डान्स दिवाने जूनियर या शोचे परिक्षक म्हणून काम करत आहे. यादरम्यान नोरा फतेहीने स्वत:चा डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात नोरा ही ‘सात संमदर पार’ या गाण्यावर लावणी करताना दिसत आहे. यात ती गीत कौर बग्गा आणि कॅप्टन सोनाली कार या दोघींसोबत स्टेजवर लावणी करत आहेत.

नोरा फतेहीने या दृश्याच्या पडद्यामागचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नोरा फतेहीने हिरव्या रंगाचा क्रॉप टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे. याला कॅप्शन देताना तो म्हणाला, “माझ्या ज्युनियर्ससोबत स्टेजवर डान्स करताना खूप मजा आली. यावेळी मी लावणीचा प्रयत्न केला. सोनाली आणि गीत या दोघीही अप्रतिम डान्सर आहेत. या व्हिडीओच्या मागेच तुम्ही जी कमेंट्री एकत आहात, ती देखील मला फार आवडली.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नोरा फतेहीने ‘सात समंदर पार’ या गाण्यावर लावणी नृत्य सादर केले. हे गाणे उदित नारायण आणि साधना सरगम ​​यांनी गायले आहे. हे गाणे ‘विश्वात्मा’ चित्रपटातील आहे. या गाण्याच्या मूळ ट्रॅकमध्ये दिव्या भारती दिसली होती. दरम्यान नोरा ही शेवटची ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटात दिसली होती. ती लवकरच ‘थँक गॉड’ आणि ‘हरी वीरा मल्लू’ या तेलुगू चित्रपटात दिसणार आहे.