‘ठंड तो नहीं लग रही?’; दीप-वीरच्या रिसेप्शनवर गमतीशीर मीम्स व्हायरल

दीप-वीरने या समारंभाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच ते तुफान व्हायरल झाले.

deep veer
रणवीर-दीपिका

अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नसोहळ्याची चर्चा संपूर्ण देशभरात झाली. दीप-वीरने या समारंभाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच ते तुफान व्हायरल झाले. या फोटोंनंतर त्यांचे मजेशीर मीम्ससुद्धा व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. बेंगळुरूमध्ये मित्रपरिवारासाठी दीप-वीरने रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. त्याचेही फोटो या दोघांनी पोस्ट केले. रणवीर- दीपिकाच्या कपड्यांपासून ते रणवीरच्या फॅशन सेन्सपर्यंत प्रत्येक गोष्टीवरून सोशल मीडियावर मीम्स व्हायरल झाले.

बेंगळुरूनंतर मुंबईत दीप- वीरने तीन पार्ट्यांचं आयोजन केलं आहे. २४, २८ आणि १ डिसेंबर असे तीन दिवस मुंबईतल्या आलिशान हॉटेलमध्ये कुटुंबीय, विविध क्षेत्रातील नामांकित लोक आणि बॉलिवूड कलाकारांसाठी या पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. २८ तारखेला रणवीरच्या कुटुंबीय आणि मित्रपरिवारासाठी मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार्टी असणार आहे. तर १ डिसेंबरला बॉलिवूड कलाकारांसाठी पार्टी ठेवण्यात आली आहे. अमिताभ बच्चन, कतरिना, आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा अशी अनेक मंडळी पार्टीसाठी उपस्थित राहणार असल्याचं समजत आहे.

१४ नोव्हेंबरला कोंकणी तर १५ नोव्हेंबरला सिंधी पद्धतीनं दीपिका आणि रणवीर विवाहबंधनात अडकले. इटलीतील लेक कोमो परिसरात मोजक्यात लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Deepika padukone and ranveer singh reception memes that went viral on the social media

ताज्या बातम्या