बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि पती रणवीर सिंह लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. ते दोघे बऱ्याच वेळा मुंबईतील कोणत्या रेस्टॉरंटमध्ये दिसतात. यावेळी दीपिका आणि रणवीरसोबत स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधु दिलसी होती. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र, चर्चा झाली ती एका फोटोग्राफरच्या चप्पलची.

हा मजेदार व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत दीपिका, रणवीर आणि पीव्ही सिंधु मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसले. दीपिका आणि रणवीरने आधी पीव्ही सिंधुला तिच्या गाडीत बसवले आणि नंतर ते त्यांच्या गाडीकडे जाऊ लागले. त्यावेळी त्या दोघांचे लक्ष हे रस्त्यात असलेल्या चप्पलकडे गेले. दीपिका सतत फोटोग्राफरला बोलत होती की तुम्ही तुमची चप्पल तर घ्या. फोटोग्राफर बोलतो माझी नाही. त्यावर दीपिका बोलते, तुमचीच आहे. त्यावर फोटोग्राफर म्हणाला, मी नंतर घेईन. तेवढ्यात रणवीर देखील म्हणाला, अरे दादा चप्पल तर घेऊन घे. हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : ‘तुम्ही दोघांनी मुलांना खूप चांगले संस्कार दिले आहेत’, व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी रितेश आणि जिनेलियाचं केलं कौतुक

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)

आणखी वाचा : ‘याला म्हणतात संस्कार’, बिग बींची नात आराध्याचा डान्सनंतर भजन गातानाचा व्हिडीओ झाला व्हायरल

दरम्यान, दीपिका रणवीरसोबत ’83’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्यानंतर दीपिका ‘पठाण’ आणि ‘फाइटर’, ‘द इंटर्न’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. दुसरीकडे, रणवीर सिंह ‘सर्कस’, ‘तख्त’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.