अभिनेत्री दीपिका पदुकोणने बॉलिवूडसह हॉलिवूडलाही आपल्या अभिनयाने भुरळ पाडली आहे. दीपिका पदुकोण हे सातत्याने चर्चेत असणारे नाव आहे. आजपर्यंतचा तिचा अभिनय क्षेत्रातला प्रवास, तिच्या आयुष्यात आलेला नैराश्याचा काळ, नातेसंबंध, वैयक्तिक आयुष्य यांवर दीपिका नेहमीच खुलेपणाने बोलते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकाने तिच्या आयुष्यातील नैराश्य काळाबद्दल सांगितले. “त्यावेळी जर माझी आई नसती तर मी बरी होऊ शकली नसती”, असा खुलासाही तिने यावेळी केला.

यावेळी दीपिका म्हणाली, “त्यावेळी नैराश्य येण्यामागचे तसे काही कारण नव्हते. तो माझ्या करिअरमधील उत्तम काळ होता. सगळं व्यवस्थित सुरू होत. पण तरीही मी कधी कधी पूर्णपणे खचून जायचे. अशावेळी आत्महत्या करण्याचा विचार देखील यायचा.”

आणखी वाचा – “नीट वाग आता माझं लग्न झालंय…” भर कार्यक्रमात ओरडली दीपिका पदुकोण

“एकदा माझे आई वडील घरी आले असताना त्यांनी मला पूर्ण खचलेले पाहिलं. त्यावरून माझ्या आईला हे नैराश्य असल्याचे लक्षात आले आणि आईमुळे मला यातून बाहेर पडण्यास मदत झाली” असे ती म्हणाली.

आणखी वाचा – इंटिमेट सीनसाठी रणवीरची परवानगी घेते का? दीपिका, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘पठाण’ या चित्रपटातून शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण ही जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी जानेवारी महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी दीपिकाने सोशल मीडियावर या चित्रपटातील तिचा लूक शेअर केला होता.