बॉलीवूड दीवा दीपिका पदुकोण लवकरच विन डिसेलसोबत xXx: द रिटर्न ऑफ एक्झांडर केज या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाद्वारे ती हॉलीवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण करेल. या चित्रपटातील घडामोडी दीपिका वरचेवर इन्स्टाग्रामवरून शेअर करत होती. चित्रपटाच्या शूटींग दरम्यानचे काही फोटो देखील दीपिकाने शेअर केले होते.
नुकतेच दीपिका पदुकोणने xXx: द रिटर्न ऑफ एक्झांडर केज या चित्रपटातील तिच्या भूमिकेची झलक दाखवणारे पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटात ती आकर्षक अशा सेरेनाची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर एक तत्वज्ञान म्हणजेच फिलोसॉफी लिहलेली आहे. चांगल्या मुलांवर माझा विश्वास नाही (I don’t believe in good guys) अशी ओळ दीपिकाच्या स्केचसोबत लिहण्यात आलेली आहे. xXx मध्ये दीपिका विन डिझेलसोबत रोमान्स करताना दिसणार असून ती यात काही अॅक्शन सीनदेखील करणार आहे. विन डिझेलसोबतचा दीपिकाचा सेल्फी सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यापासून तिच्या हॉलीवूड पदार्पणाबाबतच्या चर्चांना उधाण आले होते. चित्रपटाच्या शूटींगचा शेवट झाला त्या दिवशी दीपिकाने लेदर टाइट्स आणि जॅकेट परिधान केले होते. डिझेल व्यतिरीक्त दीपिका निना डॉब्रेव, डॉनी येन, टॉनी जा यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. xXx: द रिटर्न ऑफ एक्झांडर केज हा चित्रपट पुढील वर्षी १७ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
xXx: द रिटर्न ऑफ एक्झांडर केज या चित्रपटापूर्वी दीपिकाला फास्ट अॅण्ड फ्युरियस ७ या चित्रपटाबाबत विचारणा करण्यात आली होती. पण त्यावेळी ती संजय लीला भन्साळीच्या चित्रपटात व्यस्त असल्याने तिने आपले हॉलीवूड पदार्पण पुढे ढकलले होते.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jul 2016 रोजी प्रकाशित
दीपिका म्हणतेय, चांगल्या मुलांवर माझा विश्वास नाही
चित्रपटातील घडामोडी दीपिका वरचेवर इन्स्टाग्रामवरून शेअर करत होती.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 09-07-2016 at 18:12 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone reveals her first poster of xxx the return of the xander cage see pic