२०१९ मध्ये प्रदर्शित झालेली ‘दिल्ली क्राईम’ ही वेबसीरिज निर्भया बलात्कार प्रकरणावर आधारित होती. ही वेबसीरिज नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली होती. या वेबसीरिजमधील सर्वच पात्रांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली. या वेबसीरिजने एमी पुरस्कारही पटकावला होता. या वेबसीरिजचा दुसरा भाग येत्या २६ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच दुसऱ्या सिझनचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरवरून दुसरा सिझनदेखील तितकाच रोमांचक असणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

या ट्रेलरमध्ये दिल्ली पोलीस सिरीयल किलरच्या शोधात असलेले दिसत आहेत. डीसीपी वर्तिका सिंगच्या भूमिकेत पुन्हा एकदा शेफाली शाह दिसणार आहे. तर त्यांच्या टीममध्ये रसिका दुग्गल, राजेश तैलंग, आदिल हुसैन, अनुराग अरोरा, सिद्धार्थ भारद्वाज आणि गोपाल दत्त हे कलाकार पुन्हा दिसतील.

आणखी वाचा – ‘तिला किस करताना मी व्हर्जिनिटी गमावली’, शेफाली शाहचा खुलासा

आणखी वाचा – पुन्हा एकदा नवं काही…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा ट्रेलर ॲक्शन, ड्रामा आणि सस्पेन्सने भरलेला आहे. पहिल्या सिझनमधील सगळ्या कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे दुसऱ्या सीझनकडून प्रेक्षकांची अपेक्षा वाढली आहे. ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे डीसीपी वर्तिका सिंग यांच्यासमोर अनेक समस्या आहेत त्यावर मात करत त्यांना गुन्हेगारापर्यंत पोहोचायचे आहे. यासाठी त्या कशी योजना आखणार आणि त्या गुन्हेगारापासून दिल्लीची सुटका कशी करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.