बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा ‘राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटातील कलाकारांची स्तुती केली जातं आहे. रणदीप हुड्डाने या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली. तर रणदीपसोबत गौतम गुलाटी आणि सांगे शेल्ट्रिम होते. गौतम हा अभिनेता आहेत. तर सांगे हा एक माजी सैन्य अधिकारी आहे. एक माजी सैन्य अधिकारी असूनही सांगेने गुन्हेगाराची भूमिका साकारली आहे. तर सांगे हा भूतानच्या सैन्यात होता.
सांगेने नुकतीच ‘मिड डे’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या प्रवासाबद्दल सांगितले आहे. “मी लहानपणापासून सलमानचे चित्रपट पाहत आहे. बॉलिवूड पदार्पणाबाबत मी कधीच विचार केला नव्हता. पण कदाचित सलमानसोबत काम करणं हे माझ्या नशिबात लिहिलं होतं. त्यांच्यामुळेच मला चित्रपटात भूमिका मिळाली,” असे सांगे म्हणाला.
View this post on Instagram
‘राधे’मधील भूमिकेमुळे भूतानमध्ये फार प्रसिद्धी मिळत असल्याच सांगत सांगे पुढे म्हणाला, “भविष्यात मला मोठ्या भूमिका मिळाल्या तर मी ११० टक्के मन लावून काम करेन. मी स्वत: सैन्यात अधिकारी होतो, म्हणून सैन्य अधिकाऱ्याची भूमिका एकदा तरी मिळावी अशी माझी इच्छा आहे. याशिवाय मला अॅक्शन हीरोचीही भूमिका करायला आवडेल.”
View this post on Instagram
पुढे सांगे म्हणाला, “सैन्य दलातील अधिकाऱ्यापासून बॉडी बिल्डरपर्यंतच्या माझ्या प्रवासाने मला अभिनेता होण्यास प्रवृत्त केले. अभिनेता होण्याचं माझं स्वप्न किंवा महत्त्वाकांक्षा नव्हती. मी चुकून या क्षेत्रात आलो.”
गुरुवारी ‘राधे’ प्रदर्शित झाला आणि दुबईत चक्क सलमानचा चित्रपट पाहण्यासाठी लोकं २-३ तास आधी येऊन चित्रपटगृहाच्या तिकीटासाठी रांगेत उभे होते. मात्र, हा चित्रपट अनेकांच्या पसंतीस उतरु शकला नाही. तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर राधेने सगळे रेकॉर्ड तोडले आहे.