छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील जेठालाल, बबिता आणि दयाबेन या भूमिका साकारणारे कलाकार सतत चर्चेत असतात. सध्या जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी त्यांच्या मुलीच्या लग्नामुळे सध्या चर्चेत आहेत. त्यांच्या मुलीचा व्हायरल झाला फोटो पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली आहे.
दिलीप जोशींनी त्याच्या मुलीचे लग्नातील काही फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये नियतीने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. मात्र, काही नेटकऱ्यांचे लक्ष हे तिच्या पांढऱ्या केसांवर गेले. त्यानंतर नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली आहे.
आणखी वाचा : लग्नाला होकार देण्यापूर्वी कतरिनाने विकीसमोर ठेवली होती ‘ही’ एक अट
आणखी वाचा : कधी मारहाण, तर कधी शिवीगाळ ; रणबीरने सांगितला संजय लीला भन्साळींसोबत काम करण्याचा अनुभव

नियतीचे हे फोटो पाहिल्यानंतर एक नेटकरी म्हणाला, पांढरे केसांमधला तिचा आत्मविश्वास हा पाहण्यासारखा आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, याचा आनंद आहे की अजुनही असे लोक आहेत ज्यांना इतर लोक काय बोलतात याचा फरक पडत नाही. आपण जसे आहोत तसं राहणं ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, पांढरे केस असूनही तिचा आत्मविश्वास हा कौतुकास्पद आहे. आणखी एक नेटकरी म्हणाला, स्वत:च्या लग्नात पांढर केस ठेवण्यासाठी हिंमत पाहिजे, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली आहे.