दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिझमवरुन वाद सुरु झाला. अनेक स्टार किड्सना बॉलिवूडमध्ये लॉन्च करणारा दिग्दर्शक करण जोहरला तेव्हापासून सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येतंय. तसंच अनेक स्टार किड्सच्या चित्रपटांना नेटकऱ्यांनी डिसलाईक करून #BoycottBollywood ची मोहीम सुरू केली. याचा फटका आतापर्यंत अनेक बड्या बजेटच्या चित्रपटांना देखील बसलाय. ‘दोस्ताना २’ मधून अभिनेता कार्तिक आर्यनला बाहेर काढल्यानंतर हा नेपोटिझमचा वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. त्यामुळे दिग्दर्शक करण जोहर नेटकऱ्यांचा पुन्हा एकदा टार्गेट बनला आहे. या सगळ्यातून स्वतःचा बचाव करण्यासाठी करण जोहरनेही एक ‘मास्टरप्लॅन’ आखलाय.
‘दोस्ताना २’ मधून अभिनेता कार्तिक आर्यनला बाहेर काढल्यानंतर दिग्दर्शक करण जोहरने फिल्मसाठी अक्षय कुमार, राजकुमार राव, वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि सिद्धांत चतुर्वेदी या अभिनेत्यांची नावं सध्या चर्चेत असल्याचं बोललं जातंय. तसंच या चित्रपटाच्या कास्टिंगसाठी करण जोहरने त्याच्या क्रिएटीव्ह टीम आणि दिग्दर्शकांसोबत एक बैठक देखील घेतली असल्याचं बोललं जातंय. या बैठकीमध्ये काही निवडक अभिनेत्यांची नावं सांगितली गेली, परंतू यापैकी ‘खिलाडी’ अभिनेता अक्षय कुमार याला चित्रपटात घेण्यासाठी करण जोहर शक्य तितके प्रयत्न करतोय इतकंच नाही तर करण जोहरने आणखी एक मोठा निर्णय घेतलाय.
नेपोटिझमपासून दूर राहण्यासाठी करण जोहरचे प्रयत्न
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर लागलेल्या आरोपानंतर दिग्दर्शक करण जोहर कोणत्याच प्रकारची जोखीम उचलायला तयार नाही. नेपोटिझमच्या वादात पुन्हा एकदा स्वतःचे नाव येऊ न देण्यासाठी दिगर्शक करण जोहर प्रयत्न करतोय. ‘दोस्ताना २’ चित्रपटासाठी करण जोहरने ५ जणांची नावं शॉर्टलिस्ट केली आहेत. यातील ४ जण तर आऊटसाइडर असल्याचं बोललं जातंय.
ही आहे चित्रपटाची कथा
अभिनेता कार्तिक आर्यनला काढल्यानंतर सध्या तरी या चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आली आहे. लॉकडाउन उघडल्यानंतरच या चित्रपटाच्या पुढच्या शूटसाठी विचार केला जाणार असल्याचं बोललं जातंय. ‘दोस्ताना २’ हा २००८ मध्ये आलेल्या ‘दोस्ताना’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटाची कथा एकाच मुलाच्या प्रेमात पडलेल्या बहिण-भावाच्या आयुष्याभोवती फिरते. या चित्रपटासाठी जी नवी कास्टिंग होणार आहे ती चित्रपटामधल्या भावाच्या रोलसाठी होणार आहे.