जॉन अब्राहम दिसणार नव्या भूमिकेत, केली आगामी चित्रपटाची घोषणा

बॉलिवूडचा अॅक्शन किंग अशी ओळख असणाऱ्या अभिनेता जॉन अब्राहमनेही त्याच्या आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर करत घोषणा केली आहे. हे त्याने त्याच्या चाहत्यांना दिलेले एक मोठे सरप्राईज आहे असंच म्हणावं लागेल.

जॉन अब्राहम दिसणार नव्या भूमिकेत, केली आगामी चित्रपटाची घोषणा

काल स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर एकापाठोपाठ एक नवीन चित्रपटांची घोषणा वेगवेगळे कलाकार आणि निर्मात्यांकडून करण्यात येत होती. बॉलिवूडचा अॅक्शन किंग अशी ओळख असणाऱ्या अभिनेता जॉन अब्राहमनेही त्याच्या आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर करत नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. हे त्याने त्याच्या चाहत्यांना दिलेलं एक मोठं सरप्राईज आहे असंच म्हणावं लागेल. जॉनने स्वातंत्र्यदिनाच्याचे अवचित्य साधून चाहत्यांना त्याचा आगामी चित्रपट ‘तारिक’बद्दल माहिती दिली आहे.

आणखी वाचा : ‘या’ कलाकारांना करायचे होते सैन्यदलात काम, पण…

सोशल मिडियावर या चित्रपटाचं एक पोस्टर जॉनने शेअर केलं आहे. या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये जॉनने लिहिले की, ‘आझादी की ‘तारिक’, १५ ऑगस्ट २०२३…’बाटला हाऊस’ आणि ‘तेहरान’नंतर आता ‘तारिक’… बेक माय केक फिल्म्ससोबत आमचा पुढचा पुढील चित्रपट…चांगल्या कथा सांगण्याच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्याची हीच ती वेळ. ’

दिग्दर्शक अरुण गोपालन या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर चित्रपटाची निर्मिती जॉन अब्राहम, संदीप आणि शोभना यादव करत आहेत. हे पोस्टर पाहून जॉनचा हा पुढचा चित्रपटदेखील देशभक्तीचे उदाहरण म्हणून आपल्या समोर येणार आहे हे प्रेक्षकांसमोर उघड झाले आहे. जॉन अब्राहमची निर्मिती असलेला हा चित्रपट पुढील वर्षी १५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा : “महिन्याला २९९ रुपयाला विकायला तयार नाही”, OTT प्लॅटफॉर्मवरून जॉन अब्राहमचं वक्तव्य चर्चेत

यापूर्वी जॉनने परमाणु, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते २ यांसारख्या चित्रपटातून आपली देशभक्ती समोर आणत प्रेक्षकांना भारावून टाकले होते. त्याच्या या तिन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद डिल होता. हे तिन्ही चित्रपट प्रेक्षकांना आवडल्यामुळे ते आता जॉनच्या तारिक चित्रपटासाठी आतुर झाले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“किती पुरस्कार खरेदी केले?” विद्या बालनने शाहरुखला भर पुरस्कार सोहळ्यात विचारला होता प्रश्न, व्हिडीओ व्हायरल
फोटो गॅलरी