scorecardresearch

“लग्नानंतर पळून जावसं वाटत होतं”; फराह खानचा खुलासा

मिका सिंगच्या शोमध्ये फराहने हा खुलासा केलाय.

farah-khan-mikka-singh
(Photo-instagram@farahkhankunder)

बॉलिवूड कोरिओग्राफर फराह खानने आजवर अनेक बड्या सिनेमांसाठी कोरिओग्राफी केलीय. सोबतच फराहने दिग्दर्शक म्हणूनही बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण केलीय. फराहने रियॅलिटी शोमध्ये जजची भूमिका पार पाडत अनेकांना प्रोत्साहन दिलंय. दिलखुलास अंदाजासाठी फराह ओळखली जाते.

नुकतात फराहने तिच्या वैवाहिक आयुष्यातील सुरुवातीच्या काळाबद्दल खुलासा केलाय. मिका सिंगच्या ‘स्वयंवर: मिका दी वोहती’ या शोमध्ये फराहने नुकतीच हजेरी लावली होती. या शोमध्ये फराहने लग्नानंतर ती घर सोडून पळून जाणार होती असा खुलासा केला.

‘स्वयंवर: मिका दी वोहती’ या शोमध्ये फराहने मोठी धमाल केली. यावेळी तिने लग्नानंतरचा अनुभव शेअर केला. २००४ सालामध्ये फराहने फिल्म एडिटर शिरिष कुंदेरसोबत विवाह केला. मिकाच्या शोमध्ये फराहने स्पर्धकांच्या प्रश्नांची उत्तर दिली. यावेळी फराहने लग्नानंतर तिला पळून जावसं वाटत होतं असा खुलासा केला.

मिकाबद्दल बोलताना फराह म्हणाली, “मिका खूप संवेदनशील व्यक्ती आहे. एखादी जबाबदार मुलगीच त्याला सांभाळू शकते. मला वाटतं लग्नासाठी वय ठरलेलं नाही. तुम्हाला योग्य व्यक्ती मिळेल तेव्हाच तुम्ही लग्न करा. मी तर माझ्या लग्नानंतर पहिल्याच वर्षी पळून जायचा विचार करत होते. कारण त्यावेळी सर्व काही सांभाळणं खूप कठीण झालं होतं.” असं फराह म्हणाली.

फराह खानने शाहरुख खानच्या लोकप्रिय ठरलेल्या ‘मै हू ना’ सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. या सिनेमावेळीच शिरिष कुंद्रा यांनी फराह खानला प्रपोज केलं होतं. दोघांच्या अफेअरबद्दल सगळ्यात आधी शाहरुखची पत्वी गौरी खानला कल्पना आली होती. गौरी आणि फराह चांगल्या मैत्रिणि आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Farah khan open up on her marriage wnts to run kpw