करोनाची दुसरी लाट देशभरात उसळली आहे. यावेळी अनेक बॉलिवूड कलाकारांनी पुढे येऊन गरजूंना मदत करण्याचे ठरवले. आता बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कोणत्या स्वयंसेवी संस्था एक्सेल एंटरटेनमेंट आर्थिक मदत करत आहे हे सांगितले आहे. या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गरजू रुग्णांसाठी सुविधा पुरवण्याच काम करणार असल्याचे फरहानने सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फरहान अख्तरचे हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. त्याने त्याच्या ट्वीटमध्ये NGOम्हणजेच स्वयंसेवी संस्थांची एक संपूर्ण लिस्ट दिली आहे. “करोना विरुद्ध लढ्यात आतापर्यंत देणगी दिलेल्या सगळ्या संस्थांची नावं शेअर करत आहे. ऑक्सिजन ते रुग्णवाहिकांपासून अन्न या सगळ्या गरजेच्या वस्तू पुरवण्याचे अविश्वसनीय काम या संस्था करत आहेत. प्रत्येकाने थोडी मदत करण्यासाठी स्वत:ला प्रोस्ताहित करा. प्रत्येक रुपयाला महत्त्व आहे. जय हिंद,” अशा आशयाचे ट्वीट फरहानने केले आहे.

हेमकुंट फाउंडेशन, डॉक्टर फॉर यू, मिशन वायु, रसोई ऑन व्हील्स, गिव इंडिया, होप वेलफेयर ट्रस्ट, एसबीएस फाउंडेशन, सत्यार्थ सोशियो या काही संस्था आहेत ज्या रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करुण देण्यासोबतच क्वारंटाइन रुग्णांसाठी भोजन आणि करोना व्हायरसशी झुंजणाऱ्या रुग्णांना औषधे उपलब्ध करून देत आहेत.

दरम्यान, करोना विरुद्ध लढ्यात मदत करण्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकार त्यांच्या सोशल मीडिया वापरत आहेत. प्रियांका चोप्राने भारताला मदत करण्यासाठी निधी गोळा करत आहे आमि सोबतच करोना संबंधीत सगळ्यागोष्टींची माहिती ही सोशल मीडियावर शेअर करत आहे. अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना यांनी १०० ऑक्सिजन सिलेंडर्स दान केली. तर सलमान खान फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना जेवण पुरवत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farhan akhtar s excel entertainment extends a helping hand amid covid 19 crisis actor shares a list of ngos provided with donations dcp
First published on: 02-05-2021 at 11:03 IST