‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरियस’ या सीरिजचा दहावा भाग म्हणजेच ‘फास्ट एक्स’ (Fast X) हा चित्रपट १९ मे २०२३ रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शित झाल्यापासून ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरियस’च्या चाहत्यांनी चित्रपटगृहांबाहेर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. जगभरात बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेल्या इतर १० चित्रपटांना ‘फास्ट एक्स’ कलेक्शनच्या बाबतीत तगडी टक्कर देत आहे. भारतात २०२३ मध्ये एकाही हॉलीवूड चित्रपटाला १०० कोटींचा टप्पा पार करता आला नव्हता. ही कामगिरी फास्ट एक्स चित्रपटाने अवघ्या १२ दिवसांमध्ये केली आहे.

हेही वाचा : “टायगर श्रॉफचे नवे टॅलेंट…”; गाणं गाताना शेअर केला व्हिडीओ, निक जोनसच्या कमेंटने वेधले लक्ष

‘फास्ट एक्स’ हा चित्रपट ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरियस’च्या सीरिजमधील दहावा भाग आहे. अ‍ॅक्शन, फॅमिली ड्रामा आणि रहस्यमय घडामोडींनी परिपूर्ण असलेल्या फास्ट एक्स चित्रपटाला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे यंदाच्या वर्षात भारतात, १०० कोटींचा टप्पा पार करणारा हा पहिला हॉलीवूड चित्रपट ठरला आहे. रिलीज झाल्यावर १२ व्या दिवशी ‘फास्ट एक्स’ चित्रपटाने भारतात १०५ कोटींची कमाई केली आहे. तसेच जगभरात या चित्रपटाने आतापर्यंत ५०० मिलियन अमेरिकन डॉलरचा आकडा पार केला आहे.

हेही वाचा : “ओव्हर अ‍ॅक्टिंगचे पैसे कापा” चेन्नई सुपरकिंग्सने IPL जिंकल्यावर विकी-सारा झाले ट्रोल; नेटकरी म्हणाले, “आधी गुजरात…”

हॉलीवूड स्टार विन डिझेल मुख्य भूमिका साकारात असलेल्या ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरियस’च्या संपूर्ण सीरिजचे भारतात असंख्य चाहते आहेत. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण या चित्रपटाच्या नव्या सीरिजची आतुरतेने वाट पाहत असतो. भारतात हिंदी भाषेत सुद्धा हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘फास्ट एक्स’ चित्रपटात अभिनेता विन डिझेल मुख्य भूमिका साकारत असून त्याच्याबरोबर जेसन मोमोआ, मिशेल रॉड्रिग्ज, टायरेस गिब्सन, लुडाक्रिस, जॉन सीना, नॅथली इमॅन्युएल, जॉर्डना ब्रूस्टर, सुंग कांग, स्कॉट ईस्टवुड, डॅनिएला मेल्चियोर, ॲलन रिचसन, हेलन मिरेन, ब्री लार्सन, रीटा मोरेनो, जेसन स्टॅथम आणि चार्लिझ थेरॉन यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.