प्रत्युषा बॅनर्जीच्या प्रियकरावर पुन्हा गुन्हा दाखल

प्रत्युषा प्रकरणात जर पोलीस माझे काही करु नाही शकले तर तुम्ही काय आहात?

प्रत्युषाचा प्रियकर राहुल राज सिंह परत एकदा प्रकाश झोतात आला आहे. यावेळी त्याच्यावर एक अभिनेत्री आणि त्याची मैत्रीण यांच्या छेड छाड प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या अभिनेत्रीने सांगितले की, ही घटना रविवारी अंधेरी पश्चिमच्या बोरा बोरा रेस्ट्राँमध्ये झाली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या रात्री राहुल आपल्या मित्रांबरोबर जेवण करायला त्या ठिकाणी गेले होते. तेव्हा तिकडे दुसरी अभिनेत्री आणि निर्माते तिकडे पोहचले. इंग्रजी वृत्तपत्र मिड डेशी संवाद साधताना ती अभिनेत्री बोलली की, रात्री साधारण १२-३० वाजता राहुल तिथे आला, त्याने आम्हाला पाहिलं आणि तो आमच्याकडे आला. तो माझ्या मैत्रिणीशी भांडायला लागला. यानंतर त्याने तिच्यावर हातही उचलला.

जेव्हा मी राहुलला थांबवण्याचे प्रयत्न केले त्याने माझ्यावर शिवीगाळ करायला सुरुवात केली. यानंतर राहुलबरोबर आलेल्या मुलीशी मी बोलले तर तिनेही सांगितले की राहुल जे वागला ते योग्य नव्हतं. याही पुढे जाऊन राहूल बोलला की मी तुमच्यासारख्या अनेक मुलींना सांभाळलं आहे. प्रत्युषा प्रकरणात जर पोलीस माझे काही करु नाही शकले तर तुम्ही काय आहात? तुम्ही माझ्यासमोर काहीच नाही. त्याने एवढे मद्यपान केले होते की तो साधा उभाही राहू शकत नव्हता.
या घटनेनंतर दोन्ही मुली आंबोली पोलीस स्थानकात गेल्या आणि तिथे राहुलच्या विरोधात एफआयआर नोंदवली. या प्रकरणावर बोलताना पोलीस स्थानकात उपस्थित इधिकाऱ्याने सांगितले की, राहुलच्या विरोधात आयपीसी अंतर्गत ३५४,५०९, ५००४ आणि ३४ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही या घटनेच्या सत्यतेसाठी सीसीटिव्ही फूटेज पाहत आहोत. कोणालाही अटक करण्यापूर्वी आम्ही चौकशी करत आहोत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Fir registered against rahul raj singh for molesting actress