मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारी प्राजक्ता वेळोवेळी तिच्या कामाचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असतेच पण यासोबत तिच्या रोजच्या आयुष्यातील घडमोडी आणि अनुभव याबाबतही ती अनेकदा लिहिताना दिसते. सध्या संपूर्ण महाराष्टात गणेशोत्सव साजरा केला जातोय आणि प्राजक्ताने पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचं दर्शन घेतलं. यावेळचे काही फोटो तिने चाहत्यांशी शेअर केले आहेत.

प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर पुण्यातील मानाच्या गणपतींच्या दर्शनाचे फोटो शेअर केले आहे. हे फोटो शेअर करताना तिने लिहिलं, “सालाबादप्रमाणे… पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचं दर्शन. त्याचबरोबर यंदाच्या वर्षी “हिंदुस्तानातील पहिल्या सार्वजनिक गणपतीची – भाऊसाहेब रंगारी गणेशाची” आरती करण्याचं पुण्य पदरात पडलं.” प्राजक्ताची ही पोस्ट आणि फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या फोटोंमध्ये तिच्यासह तिची भाचीही दिसत आहे.
आणखी वाचा-Video : प्राजक्ता माळीने सई ताम्हणकरला दिले चॅलेंज, पूर्ण करता करता वळली बोबडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राजक्ता माळीच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तिला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान प्राजक्ताच्या कामाबद्दल बोलायचं तर काही दिवसांपासून ती ‘रानबाजार’ या वेबसीरिजमुळे चर्चेत होती. यानंतर ती कंट्रोल एन प्रॉडक्शन निर्मित ‘वाय’ चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाची कथा अजित सुर्यकांत वाडीकर यांची आहे. तर या चित्रपटाची पटकथा आणि संवाद अजित वाडीकर, स्वप्नील सोज्वळ आणि संदीप दंडवते यांनी लिहिलेले आहेत. त्यासोबत प्राजक्ता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनही करताना दिसते.