बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत होते. तर कालच हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन आता ५ दिवस झाले आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.

चित्रपटाने पहिल्याच दिवशी कोटींची कमाई केली आहे. ‘बॉक्स ऑफिस इंडिया’च्या रिपोर्टनुसार, आलियाच्या चित्रपटाचे महाशिवरात्रीच्या दिवशी ९.२५ कोटी रुपयांचं कलेक्शन केलं. तर सोमवारी केलेल्या कलेक्शन पेक्षा १५ टक्के जास्त होती. तर असे म्हटले जात आहे की बऱ्याच राज्यांमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी सुट्टी असल्याने चांगलीच कमाई केली. या प्रमाणे ५ दिवसात बॉक्स ऑफिसवर एकूण ५५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Yanda Kartavya Aahe fame smita shewale what does do now
‘यंदा कर्तव्य आहे’ सिनेमाला १८ वर्षे पूर्ण! या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सध्या काय करते? जाणून घ्या
suspense and thrill janhvi kapoor ulajh movie teaser released
Video: “गद्दारी केल्याचा बदला…”, जान्हवी कपूरच्या ‘उलझ’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित, अभिनेत्री झळकणार एका वेगळ्या भूमिकेत
South Superstar Allu Arjun Pushpa 2 The Rule makers spent 60 crore on Gangamma Thalli jatara scene
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘या’ सीनसाठी खर्च केले ६० कोटी रुपये! एक-दोन नव्हे तर ‘इतके’ दिवस लागले शूटिंगसाठी
bade miyan chote miyan Vs maidan
अजय देवगण की अक्षय कुमार, कोणाच्या चित्रपटाने केली ग्रँड ओपनिंग? दोन्ही चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन….

आणखी वाचा : “मला सुद्धा मराठी चित्रपट करायचाय, जर नागराज…”; झुंड पाहिल्यानंतर आमिरने केले वक्तव्य

आणखी वाचा : रितेशचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स पाहताच जिनिलियाने दिला धक्का अन्…

आतापर्यंतचे आकडे पाहता पहिल्या आठवड्यात हा चित्रपट ७० कोटींहून अधिकची कमाई करू शकतो, असे मानले जाते. मात्र, सहाव्या दिवशी म्हणजेच बुधवारी चित्रपटाची कमाई कशी होते यावर ते अवलंबून असेल. तसे पाहता या चित्रपटाने मुंबई सर्किटमध्ये चांगली कमाई केली आहे. मुंबईच्या तुलनेत दिल्ली-यूपी सर्किटमध्ये कमी पण चांगला व्यवसाय झाला आहे.

आणखी वाचा : “गळ्यात कच्चा बादाम अडकलाय का?” रानू मंडल यांचं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी लावला कपाळाला हात

आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावडी’ हा चित्रपट मुंबईतील कमाठीपुराच्या माफिया क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगूबाई यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं आहे. अगदी कमी वयात स्वतःच्या नवऱ्यानंच कमाठीपुरामधील एका कोठ्यावर विकल्यानंतर अनेक संघर्ष करत गंगूबाई तिथल्या माफिया क्वीन कशा झाल्या, याची कथा आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. या चित्रपटात अजय देवगण करीम लाला ही भूमिका साकारताना दिसणार आहे.