Gauahar Khan Slams Amaal Mallik For Using Abusive Language : अमाल मलिक सध्या ‘बिग बॉस १९’ चा कॅप्टन आहे. कॅप्टन झाल्यांनतर घरातील अनेक सदस्य त्याच्यावर नाराज आहेत. गेल्या भागात अमाल मलिक घरातील सदस्यांवर रागावताना दिसला होता. त्याने प्रणीत मोरेशी भांडणही केले. भांडणाच्या वेळी अमाल मलिकने अपशब्द वापरले. आता, गौहर खानने यावर नाराजी व्यक्त केली आहे. गौहरच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केली आहे.

गौहर खानने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “एखाद्याच्या वडिलांना त्याच्या पाठीमागे शिवीगाळ करणे चुकीचे आहे. किती मूर्ख मुलगा आहे. तो खरोखरच खूप वाईट आहे. कदाचित त्याने ही शिवीगाळ करून स्वतःला सांत्वन दिले असेल. मला आशा आहे की वीकेंड का वारमध्ये अमालला या भाषेबद्दल फटकारले जाईल.”

प्रणित मोरेबरोबर झालेल्या भांडणात अमालने अपशब्द वापरले. प्रणित मोरेने अपशब्द वापरल्याबद्दल त्याला फटकारले. गौहर खानच्या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्स आल्या आहेत. एकाने लिहिले, “मी तुमच्याशी सहमत आहे. अमाल मलिक चुकीचा वागला आहे. शिवाय, अमालने अपशब्दांच्या बाबतीत फरहाना भट्टला मागे टाकले आहे.” दुसऱ्याने लिहिले, “ज्याप्रमाणे फरहानाला वीकेंड का वारमध्ये फटकारण्यात आले होते, त्याचप्रमाणे अमाल मलिकलाही फटकारले पाहिजे.” तिसऱ्याने लिहिले, “अमाल या सीझनमधील सर्वात वाईट स्पर्धक आहे.”

टेलीव्हिजनवरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस १९’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. शोमध्ये दररोज स्पर्धकांमध्ये मोठ्या प्रमाणात भांडणे होत आहेत. ‘बिग बॉस’ सुरू होऊन तीन आठवडे झाले आहेत आणि या खेळाला आता हळूहळू रंगत येत आहे. ‘बिग बॉस १९’ च्या तिसऱ्या आठवड्यातील ‘वीकेंड का वार’ मध्ये होस्ट सलमान खान नव्हता. तिसऱ्या आठवड्यात फराह खानवर ‘वीकेंड का वार’ची जबाबदारी होती. फराहबरोबर अक्षय कुमार आणि अर्शद वारसी हे दोघेही आले होते.

गौहर खानबद्दल बोलायचं झालं तर, झैद दरबार आणि गौहरने काही काळ डेट केल्यावर २५ डिसेंबर २०२० रोजी मुंबईत लग्न केलं होतं. करोना काळात या जोडप्याने त्यांच्या जवळच्या लोकांच्या उपस्थितीत एका खासगी सोहळ्यात लग्न केलं होतं. गौहर पतीपेक्षा तब्बल १२ वर्षांनी मोठी आहे. गौहर व झैद सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत आणि त्यांच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक अपडेट चाहत्यांबरोबर शेअर करत असतात.