नृत्यांगना गौतमी पाटील हिने पाटील आडनाव लावू नये, असा इशारा काही संघटनांनी दिला होता. त्यानंतर यावर चांगलंच राजकारण तापलं. अनेक राजकीय नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या, तसेच गौतमीने आपण पाटीलच आडनाव लावणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता गौतमी पाटीलचे वडील रविंद्र बाबूराव नेरपगारे पाटील यांनी या संपूर्ण विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. गौतमीचे वडील पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले आहेत. “मार खाऊ शकता” म्हणणाऱ्या घनश्याम दरोडेला गौतमी पाटीलचं सडेतोड उत्तर; म्हणाली, “मी इतकंच म्हणेन…” गौतमीचे वडील तिच्याबरोबर राहत नाही. ती आईबरोबर राहते, पण आता पहिल्यांदाच तिचे वडील समोर आले आहेत. त्यांनी गौतमीच्या आईपासून वेगळं होण्यामागचं कारण, गौतमीचा डान्स, तिच्यावर होणारी टीका, तिच्या आडनावावरून होणारा वाद अशा अनेक विषयांवर प्रतिक्रिया दिली. पाटील आडनाव लावू नकोस म्हणणाऱ्यांना काय सांगाल, असा प्रश्न रविंद्र नेरपगारे पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना स्पष्ट उत्तर दिलं. हेही वाचा - गौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय? "तिला पाटील आडनाव लावू नको असं कोणी कसं म्हणू शकतं. पाटील ते पाटीलच राहणार. ती पाटील घराण्यातली आहे. ती जात बदलू शकेल का? तुमचं कुळ असेल तेच राहणार, ते कसं बदलेल. त्यामुळे ती पाटील आहे आणि स्वतःला पाटीलच म्हणेल," असं गौतमी पाटीलचे वडील रविंद्र नेरपगारे पाटील म्हणाले. यावेळी टीका करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला त्यांनी लेक गौतमीला दिला. तू चांगली आहेस, लोक बोलत राहतात, त्यांच्याकडे लक्ष देऊ नको आणि चांगलं काम कर, असं ते गौतमीला म्हणाले.