Genelia reacts on Riteish Deshmukh-Preity Zinta old Viral Video : जिनिलीया देशमुखने पती रितेश देशमुख आणि प्रीती झिंटाच्या पाच-सहा वर्षांपूर्वीच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.
हा व्हिडीओ काही वेळातच एक लोकप्रिय मिम बनला. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक लोक म्हणू लागले की, जिनिलीयाला प्रीती झिंटाची ईर्षा वाटते. आता जिनिलीयाने त्या व्हिडीओबद्दल बोलले आहे.
रितेश देशमुख आणि प्रीती झिंटा यांचा व्हिडीओ अनेक वर्षांपासून इंटरनेटवर आहे. त्यात रितेश आणि प्रीती झिंटा एकमेकांचे हात धरून बोलत आहेत आणि जिनिलीया जवळच उभी राहून त्यांना पाहत आहे. रितेशने प्रीतीच्या हाताचे किस घेतले; पण व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या जिनिलीयाच्या प्रतिक्रियेवरून असे दिसून आले की, तिला प्रीती आणि रितेश यांनी अशा प्रकारे हात धरलेले आवडले नाही.
मला रितेशची नंबर वन व्हायचे आहे : जिनिलीया देशमुख
याबाबत जिनिलीया देशमुखने ‘इन्स्टंट बॉलीवूड’ला सांगितले, हे चित्रित करणाऱ्या कॅमेरामनला सलाम. त्याने खूप छान काम केले. हे पाहिल्यानंतर मी खूप हसले. जेव्हा जेव्हा मी ते पाहते तेव्हा तेव्हा मला खूप हसायला येते. मी अगदी स्पष्टपणे सांगते की, मला रितेशचे नंबर वन व्हायचे आहे. मला इतर कशाचीही पर्वा नाही. या गोष्टी आमच्यासाठी खूप क्षुल्लक आहेत. आम्ही २३ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहोत.” नंतर हा व्हिडीओ जिनिलीयाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिले की, ‘मी घरी गेल्यावर काय झाले, ते जाणून घ्यायचे आहे का?’
जिनिलीया पुढे म्हणाली, “लोक गोष्टी बनवण्याचा प्रयत्न करीत राहतात. म्हणजे प्रीती झिंटाचा व्हिडीओ (ज्यामध्ये रितेश देशमुखदेखील होता) अद्भुत होता. मला वाटतं कॅमेरामननं उत्तम काम केलं आहे. पण असे बरेच व्हिडीओ आहेत, जे बकवास आहेत. मला काही फरक पडत नाही. त्याचा काही अर्थ नाही. ते फक्त जबरदस्तीनं अतिशयोक्ती केली होती. माझी सोशल मीडिया बॅटरी कमी होती.”
जिनिलीयाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती अलीकडेच आमिर खान अभिनीत ‘सितारे जमीन पर’ चित्रपटात दिसली होती, जो अजूनही चित्रपटगृहांमध्ये सुरू आहे. हा चित्रपट २० जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.