कोकिलाबेनच्या रॅपसाँगवर ‘गोपी बहु’ची प्रतिक्रिया; म्हणाली…

‘रसोडे मे कौन था’ हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

gia manek
जिया मनेक

सोशल मीडियावर व्हायरल झालेली एखादी गोष्ट क्षणार्धात चर्चेचा विषय ठरते. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक रॅप साँग तुफान व्हायरल होत आहे. छोट्या पडद्यावरील ‘साथ निभाना साथियाँ’ या मालिकेतील कोकिलाबेन या पात्राच्या संवादांवरून हे मजेशीर रॅप साँग तयार करण्यात आलं आहे. त्यावर आता या मालिकेत गोपी बहुची भूमिका साकारत घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री जिया मानेक हिने प्रतिक्रिया दिली आहे.

‘स्पॉटबॉय’ला दिलेल्या मुलाखतीत जिया म्हणाली, “जेव्हा मी पहिल्यांदा तो व्हिडीओ पाहिला तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण मालिकेतील दृश्ये वापरून अशा प्रकारचं कोणतं गाणं बनवलं जाऊ शकतं याबद्दल मला फार कुतूहल वाटलं. लोकांना ते आवडलं आणि त्यांनी ते तुफान व्हायरलसुद्धा केलं. त्या मालिकेचा मी एक भाग होते याबद्दल मला खूप आनंद आणि समाधान आहे. आता नऊ-दहा वर्षांनंतरही त्यातील दृश्ये व्हायरल होत आहेत. तो व्हिडीओ मला फार आवडला.”

https://www.instagram.com/p/CEJ2S5cJtp2/

आणखी वाचा- कोकिलाबेनच्या रॅप साँगमुळे रातोरात प्रसिद्ध झाला यशराज मुखाटे; बॉलिवूड सेलिब्रिटींनीही केली वाहवा

हा रॅप साँग व्हिडीओ यशराज मुखाते याने बनवला असून त्यामध्ये रुपल पटेल अर्थात कोकिलाबेन त्यांची सून गोपी बहुला ‘रसोडे मे कौन था’ असा सवाल विचारते. ‘साथ निभाना साथियाँ’ ही स्टार प्लस वाहिनीवरील लोकप्रिय मालिका होती. या मालिकेतील अनेक दृश्यांवर आजवर मीम्स व्हायरल होतात. याच पार्श्वभूमीवर यशराजने तयार केलेलं हे गाणं सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gia manek aka gopi bahu of saath nibhaana saathiya responds to rasode me kaun tha video ssv

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या