२०२४ संपत आले असून वर्षाच्या शेवटाला अवघे काही दिवस उरले आहेत. या निमित्ताने गूगलने जागतिक स्तरावर सर्वाधिक सर्च केलेल्या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. या यादीत हॉलिवूड स्टार्सबरोबर तीन भारतीय कलाकारांनीही स्थान मिळवले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या यादीत शाहरुख खान, सलमान खान, दीपिका पदुकोण किंवा आलिया भट्ट यांचा समावेश नाही.

सर्वाधिक सर्च केले गेलेल्या भारतीय कलाकारांमध्ये तीन कलाकारांचा समावेश आहे. या तीन कलाकारांपैकी एक साऊथ स्टार आहे, तर एका अभिनेत्रीने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीमधून केली होती, तर या यादीत असणारी तिसरी अभिनेत्री अलीकडे बरीच चर्चेत आली होती. या यादीत हॉलिवूडच्या अनेक कलाकारांचा समावेश असून त्यांच्यांसह अनेक भारतीय सेलिब्रिटींना २०२४ मध्ये सर्वाधिक वेळा गूगलवर सर्च करण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊया या सेलिब्रिटींबद्दल.

हेही वाचा…मराठमोळ्या हवाई सुंदरीच्या प्रेमात पडलेला आर माधवन! सांगितलं २५ वर्षांच्या वैवाहिक आयुष्याचं गुपित, म्हणाला…

पवन कल्याण (Pawan Kalyan)

या यादीत भारतीय कलाकारांमध्ये पहिले नाव साऊथ फिल्म इंडस्ट्रीच्या सुपरस्टार पवन कल्याण यांचे आहे. पवन कल्याण यांनी यावर्षी विधानसभा निवडणूक जिंकली आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री बनले. गूगलच्या ग्लोबल सर्च यादीत त्यांचं नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. पवन कल्याण हे प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी यांचे लहान भाऊ आहेत आणि त्यांनी अनेक हिट चित्रपटांद्वारे स्वतःचं वेगळे स्थान निर्माण केले आहे.

हिना खान (Hina Khan)

या यादीत दुसरे नाव अभिनेत्री हिना खानचे आहे. हिनाने आपल्या करिअरची सुरुवात ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या टीव्ही शोमधून केली होती. यानंतर तिने ‘बिग बॉस’सह अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला तसेच चित्रपटांमध्येही काम केले. यावर्षी हिनाने एका सोशल मीडिया पोस्टद्वारे जाहीर केले की, ती स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सरशी लढत आहे. यानंतर तिने आपल्या आरोग्याविषयी अपडेट्स शेअर करत चाहत्यांशी संवाद साधला. हिना खान या यादीत पाचव्या स्थानावर आहे.

हेही वाचा…कर्करोगाशी लढा देणाऱ्या हिना खानने शेअर केले फोटो; प्रकृतीबद्दल अपडेट देत म्हणाली, “गेले १५ ते २० दिवस माझ्यासाठी…”

निम्रत कौर (Nimrat Kaur)

गूगलच्या या यादीत आठव्या स्थानावर बॉलीवूड अभिनेत्री निम्रत कौरचे नाव आहे. अभिनेत्री अलीकडेच अभिषेक बच्चनबरोबरच्या अफेअरच्या बातम्यांमुळे चर्चेत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निम्रतमुळेच अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्यात दुरावा आला असल्याचं म्हटले जात आहे.

हेही वाचा…‘कॅप्टन अमेरिका’ फेम अभिनेता क्रिस एव्हान्सचं मार्व्हल सिनेमात पुनरागमन; ‘या’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या यादीत भारतीय कलाकारांशिवाय हॉलीवूड स्टार्सही झळकले आहेत. यात कॅट विलियम्स, अ‍ॅडम ब्रॉडी, एला पर्नेल, कीरन कल्किन, टेरेंस हॉवर्ड, सटन फॉस्टर आणि ब्रिगिट बोजो यांची नावे समाविष्ट आहेत.