बॉलिवूडमध्ये ‘बॅड मॅन’ म्हणून ओळख असणारे अभिनेते म्हणजे गुलशन ग्रोवर. चित्रपटातील त्यांच्या निगेटीव्ह भूमिका विशेष गाजल्या होत्या. या निगेटीव्ह भूमिकांचा त्यांच्या खऱ्या आयुष्यावरही परिणाम झाला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी याबाबत वक्तव्य केले आहे.

गुलशन ग्रोवर यांनी झूमला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी शेवटच्या क्षणी विमानाचे तिकिट बूक केले होते आणि त्यामुळे शेवटची सीट मिळाल्याचे सांगितले होते. तसेच फ्लाईट टेकओव्हरला उशिर झाला होता कारण फ्लाइट अटेंडेट त्यांना घाबरत होती. तसेच त्यांच्यासोबत बसण्यासही तिने नकार दिला होता.
Video: ‘जान लगा के देश के लिए खेलना’, रणवीर सिंगच्या 83चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मला विमानातील जी शेवटी जागा मिळाली ती एअर हॉस्टेससोबत शेअर करावी लागणार होती. ती एअर हॉस्टेस आत आली आणि मला पाहून दोन मिनिटे थांबली. त्यानंतर ती लगेच तेथून निघून गेली. ती तिच्या बाहेर असणाऱ्या मैत्रीणींशी गप्पा मारत होती आणि ते मी पाहिले होते. मी जोरात ओरडलो आणि तिला म्हणालो तुझं काय सुरु आहे? विमान सुरु का नाही झाले. तेव्हा ती म्हणाली, आमची एक एअर हॉस्टेस तुमच्या शेजारी बसायला घाबरते. तिला तुमच्या शेजारी बसायचे नाही’ असे गुलशन ग्रोवर म्हणाले.