छोट्या पडद्यावरील कॉमेडीयन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. दोघे ही बऱ्याचवेळा एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. एवढंच काय तर तचे दोघे कॅमेऱ्यासमोर एकमेकांची खिल्ली उडवायला चुकत नाहीत. एकदा गंमतीत हर्षने भारती सिंगला बीन बॅग म्हटल्यानंतर भारतीने त्याला सगळ्यांसमोर सडेतोड उत्तर दिले होते.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात हर्ष भारतीच्या लठ्ठपणाची चेष्टा करतो. हा व्हिडीओ ‘इंडियाज बेस्ट डांसर’ या शोमधला आहे. या व्हिडीओत हर्ष भारतीच्या लठ्ठपणाची चेष्ठा करण्याचा प्रयत्न करतो. पण भारती त्याच्या सेन्स ऑफ ह्युमरने त्याला सडेतोड उत्तर देते.

आणखी वाचा : “गळ्यात कच्चा बादाम अडकलाय का?” रानू मंडल यांचं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी लावला कपाळाला हात

आणखी वाचा : “लतादीदी गेल्यानंतर तुम्ही जसे रडलात तसे माझ्या…”, मुमताज यांनी चाहत्यांना केली विनंती

व्हिडीओत हर्ष बोलतो, बीन बॅग किती पण आरामदायी असली तरी संपूर्ण आयुष्या तिच्यासोबत नाही काढू शकतं. त्यानंतर तो लगेच त्याचा विनोद सांभाळत भारतीला बोलतो, बेबी मी विनोद करत होतो. यावर भारती बोलते, अरे या बीन बॅगवर बसण्यासाठी अनेक लोक तळमळतात. तरी सुद्धा मी या लाकडाच्या खुर्चीवर बसते.