Hardik Pandya Mahieka Sharma Video: क्रिकेटपटू हार्दिक पंड्या सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. घटस्फोटानंतर वर्षभराने हार्दिक पंड्याने डेटिंग लाइफबद्दल अपडेट शेअर केली आहे. हार्दिक पंड्या मॉडेल मालिका शर्माच्या प्रेमात आहे. हार्दिकने त्याच्या वाढदिवशी माहिकाबरोबरचे फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर आता माहिका व हार्दिक यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हार्दिक पंड्या व माहिका शर्मा ट्विनिंग करून एकत्र बाहेर पडले होते. त्यांचा व्हिडीओ पापाराझींनी शेअर केला आहे. व्हिडीओत माहिकाने बांधणी प्रिंटचा गडद लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. तर हार्दिकने त्याच रंगाचा कुर्ता घातला आहे. दोघांनीही केलेल्या या ट्विनिंगने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हार्दिक व माहिका डेट करत असल्याच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून होत्या. अखेर हार्दिकने मालदीवमधून वाढदिवसाचे फोटो पोस्ट केले. त्यात त्याने माहिकाबरोबरचे फोटो शेअर करून तिला टॅग केलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा या नवीन जोडीचा व्हिडीओ समोर आला आहे.

पाहा व्हिडीओ –

हार्दिक पंड्या व माहिका शर्मा यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काही नेटकऱ्यांनी तर हार्दिकला ट्रोलही केलं आहे. ‘नवीन गर्लफ्रेंडसाठी शुभेच्छा’, ‘भावाने मूव्ह ऑन केलंय’, ‘दोघेही भावंडांसारखे वाटतायत,’ ‘हिच्यापेक्षा मी सुंदर दिसते’, ‘याला म्हणतात टीव्ही विकून रिमोट घेणं’, ‘हिच्यापेक्षा नताशा चांगली होती’, ‘भावा सगळी प्रॉपर्टी आईच्या नावाने कर’, अशा कमेंट्स इन्स्टंट बॉलीवूडच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

hardik pandya troll becoz of girlfriend
हार्दिक-माहिकाच्या व्हिडीओवरील नेटकऱ्यांच्या कमेंट्स
hardik pandya troll
हार्दिक-माहिकाच्या व्हिडीओवरील नेटकऱ्यांच्या कमेंट्स

हार्दिक पंड्या व नताशा यांनी करोना काळात त्यांनी मे २०२० मध्ये लग्न केले. नंतर त्यांनी १४ फेब्रुवारी २०२३ रोजी हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने पुन्हा लग्न केले होते. पण हार्दिक व नताशा यांनी लग्नानंतर चार वर्षांनी जुलै २०२४ मध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. एका संयुक्त निवेदनात त्यांनी सांगितलं की ते परस्पर संमतीने वेगळे होत आहेत आणि त्यांचा मुलगा अगस्त्य याचा सांभाळ दोघेही मिळून करतील.