देशावर असलेलं करोनाच संकट हे कमी होत असल्याचं चित्र काही दिसत नाही. करोना संक्रमित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होतं असली तरी मृतांची संख्या ही अजूनही कमी झालेली नाही. करोनाचे काळे ढग डोक्यावर असताना काळ्या बुरशीचे वादळ ही आल आहे. यामुळे आपल्या चिंतेच कारण हे वाढलं आहे. देशात करोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात येत आहे. त्यातच बॉलिवूड अभिनेत्री आणि मथुराच्या भाजप खासदार हेमा मालिनी यांनी करोनापासून स्वत: चे संरक्षण करण्यासाठी एक वेगळाच पर्याय सुचवला आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हेमा मालिनी यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. वातावरण स्वच्छ आणि करोनासारख्या अनेक आजारांपासून स्वत: ला वाचवण्यासाठी त्यांनी लोकांना घरी हवन करण्यास सांगितले.

आणखी वाचा : शाहरुखच्या गाडीभोवती लोक गोळा झाले की सुहाना रडायची!

या हवनसाठी कोणत्या कोणत्या गोष्टी वापरायच्या हे देखली हेमा यांनी सांगितले आहे. त्या म्हणाल्या, “मी गेल्या अनेक वर्षांपासून पुजा झाल्यानंतर हवन करते. आणि करोनाचा संसर्ग आल्यापासून मी दिवसातून दोनदा हवन करते. यामुळे वातावरण फक्त शुद्ध होतं नाही तर पवित्र वाटतं आणि करोना सारख्या संसर्गाला आपल्यापासून दूर ठेवते.” या हवनसाठी धूप, कडुलिंबाची पानं, लवंग, मोहरी, मीठ आणि तुपाचाही वापर करण्यास त्यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा : ‘राधे माँ’, यामी गौतमचा लग्नातील ड्रेस पाहून कलाकारांनी उडवली खिल्ली

त्यापुढे म्हणाल्या, “आज संपूर्ण जग हे करोना सारख्या भयानक संसर्गाचा सामना करत आहे. मी सगळ्यांना विनंती करते की फक्त जागतिक पर्यावरणा दिनानिमित्त नाही तर जो पर्यंत आपण करोना संसर्गावर मात करत नाही तो पर्यंत रोज हवन करा. याच्याशी कोणत्याही धर्म किंवा जातीचा संबंध नाही.