अभिनेत्री आणि डान्सर हेमांगी कवी धुमाळ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. हेमांगी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. तर यासोबत ती बिनधास्तपणे तिचं मतं मांडताना दिसते. नुकताच हेमांगीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेमांगीने तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत हेमांगी गाडीत असल्याचे दिसत आहे. तर गाडीत बसून ती कोणाकडे तरी बघत असल्याचे दिसत आहे. तर हा व्हिडीओ शेअर करत जेव्हा एक हॉट मुलगा रस्ता क्रॉस करत असताना तुमच्याकडे पाहून स्माईल करतो आणि त्याचवेळी तुमच्याकडे तुमचा एक चाहता हे पाहत असतो. सत्य घटनेवर आधारीत. सेलिब्रिटी असणं इतकं सोपं नाही आहे, असे कॅप्शन दिले आहे. हेमांगीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : “The Kashmir Files चित्रपट युट्यूबवर प्रदर्शित करा”, म्हणणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना अनुपम खेर यांचे सडेतोड उत्तर; म्हणाले…

आणखी वाचा : या चित्रात तुम्हाला सगळ्यात आधी काय दिसले? यावरून कळेल तुमचे व्यक्तीमत्त्व

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेमांगी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. हेमांगीचे लाखो चाहते आहेत. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हेमांगीच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्यांच्यासोबतही असे झाल्याचे सांगितले आहे.