हॉलीवूडमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. अभिनेता जॉनी व्हॅक्टर याचा खून झाला आहे. जॉनीला गोळ्या घालून ठार करण्यात आलंय. चोरट्यांनी त्याची गोळ्या झाडून हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्याच्यावर लॉस एंजेलिसमध्ये हल्ला झाला होता. गोळ्या लागल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. जॉन फक्त ३७ वर्षांचा होता. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. अभिनेत्याच्या निधनाच्या वृत्तानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता जॉनी व्हॅक्टरवर २५ मे रोजी हल्ला झाला. अभिनेत्याची आई स्कारलेट यांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉनीवर शनिवारी पहाटे तीन वाजता हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. जॉनीच्या आईने सांगितलं की चोर त्याच्या कारमधून कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरण्याचा प्रयत्न करत होते. जॉनीने चोरांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही, मात्र तरीही चोरट्यांनी त्याला गोळ्या घातल्याचा दावा त्याच्या आईने केला आहे.

जान्हवी कपूर बॉयफ्रेंड शिखरच्या आईला ‘या’ नावाने मारते हाक, जाणून घ्या मराठमोळ्या स्मृती शिंदेंबद्दल

जॉनीच्या एजंटने केली त्याच्या मृत्यूची पुष्टी

जॉनीचा एजंट डेव्हिड शॉलने अभिनेत्याच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘पीपल मॅगझिन’शी बोलताना डेव्हिडने जॉनीच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि सांगितलं की तो एक खूप चांगला माणूस होता आणि मला त्याची नेहमीच आठवण येईल. तो खूप प्रतिभावान होता, तो खूप मेहनती होता आणि त्याने कधीही हार मानली नाही. त्याने आपल्या कामात नेहमीच सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मृत्यूने सर्वांना धक्का बसला आहे, असं डेव्हिड म्हणाला.

स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने केलं दुसरं लग्न, हिना खानने लावली हजेरी, ‘तो’ फोटो व्हायरल

सोफिया मॅटसनने वाहिली श्रद्धांजली

जॉनीबरोबर काम करणारी सहअभिनेत्री सोफिया मॅटसन हिने अभिनेत्याच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. सोफियाला जॉनीच्या मृत्यूचा मोठा धक्का बसला आहे. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करून त्याला श्रद्धांजली वाहिली. जॉनी ‘जनरल हॉस्पिटल’मधील ब्रँडो कॉर्बिनच्या भूमिकेसाठी ओळखला जातो. २०० हून अधिक एपिसोड असलेल्या या शोमध्ये जॉनीने ड्रग ॲडिक्ट साशाच्या पतीची भूमिका साकारली होती. २०२२ मध्ये त्याने हा शो सोडला होता. ‘जनरल हॉस्पिटल’ च्या टीमनेही पोस्ट करून जॉनीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ‘जनरल हॉस्पिटल’ व्यतिरिक्त तो ‘स्टेशन १९’, ‘वेस्टवर्ल्ड’ आणि ‘कॉल ऑफ ड्यूटी: व्हॅनगार्ड’मध्ये देखील दिसला होता.