गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या अक्षय कुमारचा ‘हाऊसफुल ५’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे.
अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन स्टारर ‘हाऊसफुल ५’ हा चित्रपट आज (६ जून) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होते. अशा परिस्थितीत हा चित्रपट बेकायदा साइट्सवर ऑनलाइन लीक झाला आहे.
‘हाऊसफुल ५’ ऑनलाइन लीक झाला
‘हाऊसफुल ५’ हा पूर्ण चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे. ‘हाऊसफुल ५’चे पायरेटेड व्हर्जन फिल्मीझिला, मुव्हीरुल्झ, टेलिग्राम, द तामिळरॉकर्स आणि इतर अनेक साइट्सवर एचडी प्रिंटमध्ये लीक झाले आहेत.
अक्षय व्यतिरिक्त यात फरदीन खान, डिनो मोरिया, संजय दत्त, चंकी पांडे, जॅकलिन फर्नांडिस, जॉनी लिव्हर, नर्गिस फाखरी, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, चित्रांगदा सिंग, रणजीत, निकितीन धीर, सोनम बाजवा आणि सौंदर्या शर्मा यांच्याही भूमिका आहेत.
पायरेटेड कंटेंट डाउनलोड करणे किंवा स्ट्रीम करणे हा गुन्हा आहे. त्याचे गंभीर कायदेशीर परिणाम होऊ शकतात. पायरेटेड चित्रपट पाहिल्यास मोठा दंड होऊ शकतो, त्यामुळे तुरुंगवासदेखील होऊ शकतो. ऑनलाइन लीक झालेले चित्रपट पाहणे तुमच्यासाठी धोकादायक असू शकते. यामुळे डेटा आणि आर्थिक नुकसान होऊ शकते. पायरेटेड चित्रपट पाहिल्याने निर्मात्यांचे कष्ट वाया जाऊ शकतात.
चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा जून २०२३ मध्ये करण्यात आली होती. चित्रीकरण सप्टेंबर २०२४ मध्ये सुरू झाले आणि त्याच वर्षाच्या अखेरीस पूर्ण झाले. या चित्रपटाची निर्मिती नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटने केली आहे. हा चित्रपट २४० कोटींच्या प्रचंड बजेटवर बनवला आहे.
या फ्रँचायझीसाठी पहिल्यांदाच या चित्रपटाच्या दोन आवृत्त्या आहेत, ‘हाऊसफुल ५ ए’ आणि ‘हाऊसफुल ५ बी. ‘ हा चित्रपट आज (६ जून) जगभरात प्रदर्शित झाला आहे. ‘हाऊसफुल ५’ प्रदर्शित होण्याआधीच सिनेमाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच ‘हाऊसफुल ५’ने कोटींची कमाई केली होती.