बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सारा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. दरम्यान, साराने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत साराने तिच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सांगितला आहे.

साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहे. एका फोटोत सारा योगा करताना दिसतं आहे. साराने तिच्या आवडत्या ठिकाणांचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यानंतर साराने चित्रपटांच्या सेटवरचे काही फोटो शेअर केले आहेत. तर एका व्हिडीओत सारा वर्कआऊट करताना दिसते. तर दुसऱ्या व्हिडीओत सारा चहा बनवताना दिसत आहे. हे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत “साराच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग..अंदाज लावा यातला माझा आवडता पार्ट कोणता असेल? सकाळी लवकर दिवसाची सुरुवात करण्यासाठी लवकर होणारा सुर्योदय? किंवा एका स्टाइलमध्ये चहा बनवणे?”, अशा आशयाचे कॅप्शन साराने दिले आहे. साराची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. या पोस्टला थोड्याच वेळात ६ लाख पेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे.

आणखी वाचा : आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटावर राखी सावंत म्हणाली…

आणखी वाचा : ‘इमरान खान आणि करीनाचे लग्न…’, करण जोहरने व्यक्त केली होती इच्छा

दरम्यान, साराचा ‘कूली नंबर १’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होतो. तर, काही दिवसांपासून सारा ‘अतरंगी’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात सारासोबत अभिनेता अक्षय कुमार आणि दाक्षिणात्य अभिनेता धानूष मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.