जबरदस्त अ‍ॅक्शन, शरीरयष्टी, आणि अफलातून डान्ससाठी ओळखला जाणारा अभिनेता ह्रतिक रोशन हल्ली बराच चर्चेत आहे. हृतिक हा फार मोजकेच चित्रपट करत असला तरी त्याच्या चाहत्यांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. हृतिक हा अभिनयासोबतच उत्तम डान्सर आणि फिटनेस फ्रिक अभिनेता म्हणूनही ओळखला जातो. सध्या हृतिकचा आगमी चित्रपट ‘फायटर’ची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटासाठी हृतिक बरीच मेहनत घेताना पाहायला मिळत आहे.

ह्रतिक रोशनची ‘फायटर’ ही भारतातली पहिली एरिअल अ‍ॅक्शन फिल्म आहे. या चित्रपटासाठी हृतिक प्रचंड मेहनत घेत आहे. नुकतेच त्याने सोशल मीडियावर वर्कआऊट दरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. यात हृतिकची जबरदस्त बॉडी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यात हृतिकचे बायसेप्स पाहून अनेकजण चकित झाले आहेत. ‘बोलो बॉलिवूड बायसेप्स की जय’, असे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे.

तसेच इन्स्टाग्राम स्टोरीवर त्याने काही फोटो पोस्ट केले आहे. यात त्याने ‘रेडी फॉर अ‍ॅक्शन’ आणि ‘पुढे या आणि मला पंच मारा’, असे कॅप्शन दिले आहे. हृतिकचे हे फोटो पाहून अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ फेम दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद लवकरच ‘फायटर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. ‘फायटर’ हा चित्रपट २०२२ मध्ये रिलीज होणार आहे. तसंच भारतातली ही पहिली एरिअल अ‍ॅक्शन फिल्म असणार आहे. तसंच या चित्रपटासाठी जगभरातील ठराविक लोकेशन्स सीलेक्ट करून शॉट्स घेतले जाणार असल्याचं बोललं जातंय. त्यामूळे या चित्रपटासाठी जगभरातील प्रेक्षक नजरेसमोर ठेवून चित्रपटावर काम करण्यात येणार असल्याचं दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी सांगितलंय.