हृतिकचा आगामी चित्रपट ‘क्रिश-३’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. मात्र, हृतिकच्या मुलांनी हा चित्रपट पाहिला आणि त्याच्या भूमिकांची प्रशंसा केल्याने हीच आपल्या कामाची पोचपावती असल्याचे हृतिक म्हणाला आहे. ‘क्रिश-३’ मध्ये तिहेरी भूमिका साकारणा-या हृतिकला चित्रपटातील विलनची भूमिका करण्याचीदेखील इच्छा होती. पण, वडिलांनी अडवल्यामुळे त्याने ही भूमिका केली नाही. विवेक ऑबेरॉयने कालची (विलन) भूमिका साकारली असून हृतिकने त्याच्या कामाबाबत प्रशंसा केली आहे. चित्रपटातील स्पेशल इफेक्टसचे काम भारतीय टीमने केले आहे.
राकेश रोशन दिग्दर्शित आणि निर्मित ‘क्रिश-३’ या चित्रपटात प्रियांका चोप्रा, कंगना राणावत, विवेक ओबेरॉय आणि शरयू चौहान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Aug 2013 रोजी प्रकाशित
‘क्रिश-३’मधील भूमिकेची हृतिकच्या मुलांनी केली प्रशंसा!
हृतिकचा आगामी चित्रपट 'क्रिश-३' लवकरच प्रदर्शित होणार आहे.
First published on: 11-08-2013 at 04:50 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hritiks role in krish 3 appreciated by his childrens