बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता बऱ्याच काळापासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. ती बहुतांश वेळ अमेरिकेत असते. पण तरीही ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. गेल्या अनेक दिवसांपासून प्रसारमाध्यम, बातम्या या सर्वांपासून दूर असलेली तनुश्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतंच तनुश्रीने तिच्या विकिपीडिया प्रोफाईलवरुन संताप व्यक्त केला आहे. तनुश्रीने एक पोस्ट शेअर करत तिचे प्रोफाईल अपूर्ण असल्याचे सांगितले आहे.

तनुश्री दत्ताने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. यासोबत तिने मोठी पोस्टही लिहिली आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या पोस्टद्वारे तिने तिचे विकिपीडिया प्रोफाईल अपूर्ण असल्याचे सांगितले आहे. तसेच यात तिने तिच्या कर्तृत्वाविषयीही खुलेपणाने लिहिले आहे.

तनुश्री दत्ताची इन्स्टाग्राम पोस्ट

“नमस्कार मित्रांनो, मला आज असं काहीतरी सांगायचे आहे, जे मला बऱ्याच काळापासून त्रास देत आहे. हे माझ्या विकिपीडिया प्रोफाईलबद्दल आहे. यात माझ्याबद्दल खूप चुकीचे लिहिले गेले आहे आणि त्यासोबतच मला फक्त भारतीय मॉडेल असल्याचे सांगून माझे यश कमी केले जात आहे. मी ते बदलण्याचा प्रयत्न केला, पण ते पुन्हा तसेच दिसत आहे.”

“पहिली गोष्ट म्हणजे मी ‘मिस इंडिया युनिव्हर्स’ आणि बॉलिवूड अभिनेत्री, एक कलाकार आहे. पण विकिपीडिया मला फक्त भारतीय मॉडेल असल्याचे सांगत आहे. जेव्हा लोक एखाद्या सार्वजनिक व्यक्तिरेखेबद्दल तपासतात, तेव्हा ते प्रथम त्यांच्या कार्याबद्दल किंवा पुरस्कारांबद्दल गूगल करतात. पण माझ्या प्रोफाईलमध्ये सर्व विचित्र आणि मूर्खासारखे लिहिले आहे.”

“तुम्ही स्वतःच कल्पना करा की मी आयुष्यात इतकं काही केलं आहे, तरीही मी माझ्याबद्दल सरळ, चांगलं आणि योग्य माहिती विकिपीडियाद्वारे सादर करु शकत नाही. कदाचित हे बरोबर असतील आणि माझी बक्षिसे आणि ओळख याला स्वर्गात मान्यता असेल. तसेही मी या प्रकारच्या विचित्र गोष्टींमुळे गोंधळ करणे सोडून दिले आहे. कारण मी याबद्दल फार काही करू शकत नाही असं दिसतंय!”

अमिताभ बच्चन यांच्या ‘या’ खास गोष्टीवर नात नव्या नंदाची नजर, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जर कोणी माझी मदत करू शकत असेल तर कृपया करा…पण…मला वाटते की २०२२ मध्ये माझ्यासाठी खूप छान आणि आश्चर्यकारक गोष्टी घडणार आहेत,” असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. तनुश्रीच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहे. तसेच तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.