बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ हा चित्रपट नुकतंच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. या चित्रपटात सलमान आणि आयुष शर्मा दोघेही अनोख्या भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर सलमान खानने प्रसारमाध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा चित्रपटाचा संपूर्ण अनुभव शेअर केला आहे.

सलमान ‘अंतिम’ चित्रपटाबद्दल ई टाईम्सशी बोलताना म्हणाला, “अंतिम चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना मी फार घाबरलो होतो. मी यापूर्वी अनेक चित्रपटात पोलिसाची भूमिका साकारली आहे. मात्र या चित्रपटात ही भूमिका प्रचंड वेगळी होती. अंतिम चित्रपटातील भूमिका ही पूर्णपणे वेगळी होती. हे पात्र फार लहान असले तरी ते दमदार होते,” असे त्याने सांगितले.

या व्यक्तिरेखेबाबत सलमान म्हणाला, “मला या चित्रपटात कशाप्रकारे ही व्यक्तिरेखा साकारायची आहे, हे माझ्या मनात होते. या चित्रपटात मला सांगितल्याप्रमाणे ते पात्र साकारायचे होते. या पात्राबद्दल महेश मांजरेकरांचीही स्वतःची विचारसरणी होती. पण जेव्हा मी ते पात्र साकारायला सुरुवात केली तेव्हा मला खूप भीती वाटली. मी हे करु शकतो का? असेही मला वाटले. मात्र जेव्हा मी आयुषला त्याची भूमिका साकरताना पाहिले, तेव्हा मला विश्वास पटला की मीही माझी भूमिका साकरू शकतो,” असे त्याने म्हटले.

यापुढे सलमान म्हणाला की, “आम्हा दोघांनाही माहिती होते की, आम्ही दोघेही आमच्या भूमिका एकाच पद्धतीने साकारु शकत नाही. हे दोन्हीही पात्र पूर्णपणे वेगळे होते. आयुषची व्यक्तिरेखा दमदार असली तरी त्याला प्रचंड रागीट व्यक्ती साकारायचा होता. तर दुसरीकडे माझे पात्र हे फार शांत हसऱ्या स्वभावाचे होते. जर तुम्ही त्या पात्रावर पाणी फेकले तरी तो हसेल, असे तो म्हणाला. त्यामुळे मला त्याची ताकद माहीत होती. विशेष म्हणजे मला हे पात्र साकारताना खूप मजा आली,” असे त्याने सांगितले.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘अंतिम’ हा चित्रपट आज २६ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली आहे. सलमान या चित्रपटात सरदार पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे. तर आयुष एका वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपट मराठी ‘मुळशीपॅटर्न’ चित्रपटाचा रिमेक आहे.