मलायका अरोरा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका चित्रपटसृष्टीत सक्रीय नसली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी मलायका अरोराच्या गाडीला अपघात झाला होता. मलायका अरोरा पुण्यातील एक फॅशन इव्हेंट आटोपून मुंबईमध्ये परतत असताना तिच्या कारला अपघात झाला होता. यावेळी तिला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर काही दिवसांपूर्वीच मलायका कामावर परतली आहे. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान मलायकाने तिच्या अपघाताविषयी भाष्य केले आहे.

नुकतंच एका मुलाखतीदरम्यान मलायकाला तिच्या अपघाताबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ती म्हणाली, “अपघात झाल्यापासून आतापर्यंत मी अजूनही मानसिक धक्क्यात आहे. मी अजूनही ती दुर्घटना विसरु शकत नाही. काही दिवसांपूर्वी झालेला अपघात ही एक अशी गोष्ट आहे की ती मला लक्षात ठेवायची नाही. पण मी ते सहजरित्या विसरुही शकत नाही.”

वयाच्या फरकामुळे अर्जुन कपूर आणि मलायका ट्रोलर्सच्या निशाण्यावर, म्हणाली “मी माझ्या आईचा सल्ला…”

“जेव्हा कधी आता मी एखादा चित्रपट पाहते आणि त्यावेळी त्यातील अपघातानंतर मला रक्त दिसते. तेव्हा मला हे सर्वकाही आठवते. मी त्या अपघातादरम्यान खूप रक्त पाहिले होते. अपघातानंतर काही काळ मला काहीही समजत नव्हते. मी जिवंत आहे की नाही, याचीही मला खात्री नव्हती”, असेही ती म्हणाली.

“मला जबरदस्त धक्का बसला होता. डोकं प्रचंड दुखत होते. त्यावेळी मला फक्त मी जिवंत आहे की माझा मृत्यू झालाय, हे जाणून घ्यायचे होते. या अपघातादरम्यान एक मोठा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर मला काहीही समजत नव्हते. मी रुग्णालयात गेल्यावर मला शुद्ध आली. तोपर्यंत मी बेशुद्धावस्थेत होती”, असेही तिने म्हटले.

Video : “निरोगी व्यक्ती हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी हानिकारक कारण…”, अनुपम खेर यांनी वाढत्या महागाईवर केलेले ‘ते’ वक्तव्य चर्चेत

दरम्यान मलायका अरोराचा काही दिवसांपूर्वीच अपघात झाला होता. पुण्यातील एका फॅशन इव्हेंटमधून मुंबईला येत असताना तीन गाड्यांच्या झालेल्या अपघातात मलायकाच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तिला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. २ एप्रिलला मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर खालापूर टोल प्लाजाजवळ ही दुर्घटना घडली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अपघातानंतर मलायकाचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर तिची काळजी घेताना दिसला होता. मलायकाला भेटण्यासाठी बॉयफ्रेंड अर्जुन कपूर तिच्या घरी पोहोचला होता. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत होता.