बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा सिनेसृष्टीतील सर्वात उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. दमदार अभिनय आणि हटके भूमिकांसाठी विकीला खास ओळखले जाते. विकी कौशलने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात अभिनेत्री कतरिना कैफसोबत लगीनगाठ बांधली. ते दोघेही त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत आहेत. अनेकजण त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल विविध प्रश्न उपस्थित करत असतात. नुकतंच बॉलिवूड निर्माता करण जोहरने त्याच्या कॉफी विथ करण ७ या कार्यक्रमात विकी कौशलने त्याच्या वैवाहिक जीवनाबद्दल खुलासा केला आहे.
‘कॉफी विथ करण ७’च्या आगामी एपिसोडमध्ये विकी कौशल आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची जोडी पाहायला मिळणार आहे. एकीकडे विकी कौशल कतरिना कैफशी लग्न केल्यानंतर पहिल्यांदाच या शोमध्ये दिसणार आहे. तर दुसरीकडे सिद्धार्थ मल्होत्राही या शोमध्ये त्याच्या लव्ह लाइफबद्दल नवे खुलासे करताना दिसणार आहे. यावेळी करणने विकी कौशलला कतरिनाशी लग्न केल्यानंतर आता कसं वाटतंय? तुझे वैवाहिक आयुष्य कसे आहे? असा प्रश्न विचारला होता.
IIFA पुरस्कार सोहळ्यात एकटाच दिसला विकी कौशल, वैवाहिक आयुष्याबद्दल म्हणाला “कतरिना खूप…”
त्यावर उत्तर देताना विकी म्हणाला, “मला खरच खूप छान वाटतंय. मी कुठेतरी स्थिरावलो आहे, असे मला वाटत आहे. तिच्यासारखा सोबती मिळणं ही खूप सुंदर भावना आहे आणि मला ती आयुष्याचा जोडीदार म्हणून ती मिळाली यासाठी मी खरोखरच खूप भाग्यवान आहे, असे समजतो.
ती फारच वेगळी आहे. मी आतापर्यंत माझ्या आयुष्यात पाहिलेल्या सर्वात ज्ञानी आणि दयाळू व्यक्तींपैकी ती एक आहे मी तिच्याकडून खूप काही शिकलो आहे आणि शिकतो आहे. ती मला खरोखरच खूप आधार देते. ती माझ्यासाठी आरसा आहे. ती मला नेहमी विविध सल्ले देत असते आणि तुम्हाला अशा व्यक्तींची आयुष्यात फार गरज असते. कतरिना माझी पत्नी आहे, याचा मला खरंच खूप अभिमान आहे. यासाठी मी स्वत:ला खरोखरच भाग्यवान समजतो, असे विकी कौशल म्हणाला.
कतरिना कैफ खरंच आहे का गरोदर? पती विकी कौशलनं अखेर चर्चांवर सोडलं मौन
दरम्यान विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाहसोहळा ९ डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये शाही थाटात पार पडला. ते दोघेही ९ डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. पण हा संपूर्ण सोहळा ७ ते ९ डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला होता. दरम्यान या लग्नात कुटुंबिय आणि जवळच्या मित्रांना आमंत्रित करण्यात आले होते. या दोघांच्या लग्नाचे सर्व विधी अत्यंत गुप्तता पाळून करण्यात आले होते.