बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता पण अजूनही बॅचलर असलेल्या सलमान खानच्या लग्नाची चिंता त्याच्या चाहत्यांसह बॉलीवूडलाही लागलेली आहे. कारण दीपिका पदुकोणलाही आता सलमानने लवकरात लवकर लग्न करावे असे वाटते. आणि यामुळे ती सलमानच्या ५० व्या वाढदिवशी खास भेट देणार आहे.
दीपिका सलमानला काय भेट देणार आहे तुम्हाला माहित आहे का ? बायको. हो अगदी बरोबर वाचलात. पत्रकारांशी संवाद साधत असताना दीपिकाला विचारले असता तू सलमानला वाढदिवसाला काय भेट देशील त्यावर तिने दिलेल्या उत्तराने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. ती म्हणाली, मला सलमानला बायको भेटस्वरुपात द्यायला आवडेल. आता यावर सलमान काय उत्तर देतो याचीच उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागली असेल. याचसोबत दीपिकाने आपण सलमानसोबत सुलतान किंवा इतर कोणताही चित्रपट करत नसल्याचेही सांगितले. बिग बॉसच्या मंचावर दीपिका आणि सलमानची जोडी खूप छान दिसत असल्याचा संदेश दिग्दर्शकाने दीपिकाला पाठवला होता. त्यावर दीपिकाने सलमानसोबत नक्की काम करायला आवडेल अशी इच्छा व्यक्त करत त्याच्यासोबत कोणीही छानच दिसते असे म्हटले.
संग्रहित लेख, दिनांक 19th Dec 2015 रोजी प्रकाशित
सलमानला दीपिका भेटस्वरुपात देणार ‘बायको’
दीपिका पदुकोणलाही आता सलमानने लवकरात लवकर लग्न करावे असे वाटते.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 19-12-2015 at 01:05 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I would like to gift salman khan a bride says deepika padukone