बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग त्यांचा मुलगा इब्राहिम अली खानने अलीकडेच ‘नादानियां’ या चित्रपटाद्वारे अभिनयाच्या जगात प्रवेश केला. या चित्रपटात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर मुख्य भूमिकेत होती. थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याऐवजी तो ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.
इब्राहिमच्या पहिल्या चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक होते. शौना गौतम दिग्दर्शित हा चित्रपट प्रचंड अपयशी ठरला. त्याशिवाय चित्रपटातील अभिनयाबद्दल इब्राहिमला बरीच टीका सहन करावी लागली. आता इब्राहिमने या प्रकरणावर आपले मौन सोडले आहे.
इब्राहिम अली खानने एस्क्वायर इंडियाला मुलाखत दिली. मुलाखतीदरम्यान त्याने कबूल केले की ‘नादानियां’ हा एक खूप वाईट चित्रपट होता. तो म्हणाला, “अलीकडेपर्यंत सर्व जण माझ्या चित्रपटाची वाट पाहत होते आणि ‘नादानियां’नंतर ते सतत मला ट्रोल करायचे. ‘तो ते करू शकत नाही.’ हे खूप वाईट आहे… आणि मला सतत त्याबद्दल वाईट वाटते. मी फक्त एवढेच म्हणेन की, तो एक वाईट चित्रपट होता.”
इब्राहिम पुढे म्हणाला, “ते खरोखरच वाईट होते. ते एक प्रकारचे ‘अरे, चला त्या चित्रपटाला ट्रोल करूया’, असे बनले. काही लोक फक्त दुसऱ्याने तो चित्रपट ट्रोल केल्याचे ऐकले म्हणून त्याला ट्रोल करत होते. हे अन्याय्य आहे; पण जर मी भविष्यात ब्लॉकबस्टर चित्रपट दिला, तर मलाही अशीच प्रतिक्रिया हवी आहे. त्यांनी माझ्यामागे वेडे व्हावे.”
इब्राहिम पुढे म्हणाला, “मी खूप मेहनत घेत होतो. मी अजूनही माझ्या बोलण्याच्या अडथळ्यावर काम करीत आहे. पण एका अर्थानं, मला वाटते की, मी तो चित्रपट घाईघाईनं पूर्ण केला असेल. मी २१ वर्षांचा होतो तेव्हा मी त्याचे चित्रीकरण सुरू केले होते. माझ्या आजूबाजूचे लोक २६, २७, २८ व्या वर्षी ते करीत आहेत.”