नुकत्याच रिलीज झालेल्या ‘बिग बुल’ सिनेमात अभिनेत्री इलियाना डिक्रुजने महत्वाची भूमिका साकारली आहे. आजवर इलियानाने अनेक हिंदी आणि साउथ सिनेमांधून चाहत्यांची मनं जिंकली आहेत. मात्र इलियाना अनेकदा बॉडीशेमिंगचा सामना करावा लागला आहे.

इलियानाने नुकत्याच बॉलिवूड बबलला दिलेल्या एका मुलाखतीत तिला अगदी लहानपणापासूनच बॉडी शेमिंगचा सामना करावा लागल्याचा खुलासा केला आहे. फिगरवरून अनेकांनी तिला टोमणे मारले असल्याचं ती म्हणाली. खास करून ‘बट म्हणजेच पार्श्वभागावरून अनेकदा वेगवेगळ्या कमेंट ऐकायला मिळाल्याचं ती म्हणाली आहे.

या मुलाखतीत ती म्हणाली, “मला ते दिवस आठवतायत, जणू ते कालच घडलंय. ते खूप विचित्र होतं कारण त्याचे घाव खूप खोलवर झाले आहेत. मी १२ वर्षांची असल्यापासून बॉडी शेमिंगचा सामना केलाय. मी नुकतेची तारुण्यात येत होते आणि याचवेळी लोकांच्या विचित्र कमेंटने मला धक्का दिला होता. लोकं माझ्या शरीरावर कमेटं करायचे आणि बोलायचे, ‘अरे बापरे तुझं बट एवढं मोठं कसं?’ तेव्हा मला वाटयचं ‘म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला?’ ” असं इलियाना म्हणाली.

पुढे ती म्हणाली, “आपल्याला वाटतं आपलं सगळं ठिक आहे. पण मग लोकांच्या अशा प्रतिक्रिया ऐकून मग आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू लागतो. मला वाटचं हे खोल घाव आहेत जे अनेक वर्ष भरून निघत नाहित. लोकं काय म्हणतात याने फरक पडत नाही, हे म्हणायला देखील खूप धाडस लागतं. तुम्ही स्वत: बद्दल काय विचार करता हे महत्वाचं आहे आणि हेच मी दररोज स्वत:ला सांगते.” असं ती म्हणाली. हे सांगतानाच  मी रोज या गोष्टींच्या सामना करत असून माझ्या इन्स्टाग्राम पोस्टवर १० कमेंट तरी बॉडी शेमिंगच्या असतील असं ती म्हणाली.

वाचा : ‘तुझा स्तनपानाचा व्हिडीओ शेअर करशील का?”; नेहा धुपियाने ‘तो’ फोटो शेअर करत दिलं उत्तर

तर बॉलिवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीत देखील इलियानाने तिला आलेल्या बॉडी शेमिंगच्या अनुभवाबद्दल खुलासा केलाय. यात ती म्हणाली, ” मी १२ वर्षांची असल्यापासून लोकांनी विचित्र कमेंट दिल्या. तुझे पाय असे का आहेत?, तुझे हिपस् असे कसे ? अशा प्रश्नांमुळे मी गोंधळात पडायचे. मला लाज वाटायची” असं ती म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इलियाना अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून बॉडी पॉझिटिव्हीटीसाठी पोस्ट शेअक करते.