छोट्या पडद्यावरील ‘ इंडियन आयडल १२ ‘ हा सिंगिंग रिअॅलिटी शो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. इंडियन आयडल १२ शो मधे एक मोठा ट्विस्ट आला आहे. इंडियन आयडल १२ चे शुटिंग दमणमध्ये सुरू होत. समोर आलेल्या माहितीनुसार, इंडियन आयडलने एक मोठा निर्णय घेतल्याचे आहे. सांगितले जात आहे की सगळ्या स्पर्धकांना घरी पाठवण्यात आले आहे.
जेव्हा इंडियन आयडलचे सगळे सपर्धक मुंबईत परतले, तेव्हा निर्मात्यांनी त्यांना घरी परत जाण्याची सूचना दिली. इंडियन आयडलच्या निर्मात्यांनी नॉमिनेटेड सपर्धकांना त्यांच्या घरी जाऊन ‘ मतं ‘ मागण्याची संधी दिली आहे. तसंच त्यांचे व्हिडीओ सोशल मीडीयावर पोस्ट करण्यास सांगितलं आहेत. इंडियन आयडल १२ चा महाअंतिम सोहळा जवळ आला असून सघळेच सपर्धक प्रचंड मेहनत करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
ज्या स्पर्धकाला जास्त मतं मिळतील तोच इंडियन आयडल १२ चा विजेता होणार. त्यामुळे शोचे सगळे स्पर्धक आपआपल्या घरी जाऊन व्होट्स साठी मागणी करत आहेत. इंडियन आयडलचा एक स्पर्धक पवनदीप कुमार उत्तराखंडला त्याच्या घरी गेला आहे. पवनदीपने उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतल्याचे सांगितले जात आहे. पवनदीपचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडीयावर तुफान वायरल होत आहे. या व्हिडीओत पवनदीप उत्तराखंड मधील लोकांनचे मनोरांजन करताना दिसत आहे. काही लोक व्हिडीओ काढत असताना त्याचे गाण्याने मंत्रमुग्ध झालेले दिसत आहेत.
View this post on Instagram
दरम्यान,आता इंडियन आयडल मध्ये सातच स्पर्धकच राहीले आहेत. पवनदीप बरोबरच अरूणिता कांजीलाल, मोहम्मद दानिश, शनमुखप्रिया, सायली कांबळे, आशीष कुलकर्णी मध्ये स्पर्धा रंगणार आहे.