योग ही भारतातील ५००० वर्षे जुनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधना आहे. योगमुळे शरीर व मनात परिवर्तन घडते. शारीरिक व मानसिक रित्या निरोगी रहायचे असेल तर नियमित योगा करणे गरजेचे आहे. योगाला आता आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळालेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज जगभरात २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा होतो. याच पार्श्ववभूमीवर मराठी अभिनेत्री कृतिका गायकवाड हिने मुंबईच्या ऐतिहासिक स्थळांवर तिचे सुंदर फोटोशूट केले. या फोटोशूट मध्ये अभिनेत्री कृतिका गायकवाड हीने ऊर्ध्व धनुरासन,अंजनेयासन, वृक्षासन , उभया पादांगुष्ठसन,प्रसारित पादोत्तासन, वीरभद्रासन, बद्धकोनासन, उष्ट्रासन, सेतुबंधासन, कटिचक्रासन, अर्धहलासन, हस्तपादासन, मत्स्यासन, पश्चिमोत्तासन, अर्धचक्रासन आणि अजूनही अनेक वेगवेगळी आसने केली. या आसनांसाठी तिने मुंबईच्या ऐतिहासिक स्थळांची निवड केली. मुंबईच्या एशियाटिक लायब्ररी आणि सीएसटी स्टेशन समोरील सेल्फी पॉईंट ह्या गजबजलेल्या ठिकाणी तिने हे फोटोशूट केले. कोरोना काळात सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी या उद्देशाने तिने हे फोटोशूट केले.

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील नवीन सोनू कोणाला आवडत नव्हती, गोलीने केला खुलासा

आणखी वाचा : ‘त्या’ चित्रपटामुळे एक एक सामान विकावे लागले होते, जमिनीवर झोपायची आली होती वेळ – जॅकी श्रॉफ

याबद्दल कृतिकाला विचारले असता तिने सांगितले की , “मी नेहमीच २१ जून म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिननिमित्त काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करते. मागील वर्षी मला काहीच करता आले नाही मात्र त्या अगोदर २०१९ मध्ये मी समुद्र किनाऱ्यावर फोटोशूट केले होते. २०१८ साली मी आरे कॉलनीच्या निसर्ग रम्य ठिकाणी फोटोशूट केले होते.”

आणखी वाचा : ‘राजू’ सोबत झळकणार ‘श्याम’चा मुलगा, अहना शेट्टी करणार अक्षयसोबत काम!

कृतिका गायकवाड हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ह्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. कृतिकाने ‘विठ्ठला शप्पथ’, ‘नेबर्स’ हे चित्रपट केले असून छोट्या पडद्यावर सुद्धा ‘युवा डान्सिंग क्वीन’ हा मराठी कार्यक्रम आणि ‘माय के सी बंधी डो’, ‘शुभविवाह’ या हिंदी कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International yoga day 2021 krutika gaikwad did some yoga poses at mumbai s historical places dcp
First published on: 21-06-2021 at 19:31 IST