बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि त्याचे कुटुंबीय सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी सैफचा मुलगा इब्राहिमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत इब्राहिम अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीसोबत दिसत आहे. शुक्रवारी इब्राहिम आणि पलक तिवारी एकाच गाडीतून फिरताना दिसले होते. त्यावेळी काही फोटोग्राफर्सने त्यांचे फोटो काढले. दरम्यान, इब्राहिमने फोटोग्राफर्सला स्माइल दिली तर पलकने चेहरा लपवण्याचा प्रत्न केला. आता अशा चर्चा आहेत की ते दोघे पुन्हा कधीच एकत्र दिसणार नाही.

बॉलीवूडलाइफला एका सुत्राने दिलेल्या वृत्तानुसार, “पलकने ज्या प्रकारे तिचा चेहरा लपवला होता. ते इब्राहिमला पटलेलं नाही, उलट त्याला लाज वाटली. पहिल्यांदाच ते सार्वजनिक ठिकाणी एकत्र भेटले होते आणि पलकने ज्या प्रकारे लहानमुलं करतात त्या प्रकारे फोटोग्राफर्सला पाहिल्यानंतर पलकची प्रतिक्रिया होती. दरम्यान, स्वत:चा हा व्हायरल व्हिडीओ पाहून पलकलाही लाज वाटली. त्यानंतर पलक आणि इब्राहिमने एकमेकांशी संपर्क साधला नाही. ते चांगले मित्र आहेत, पण सध्या त्यांनी एकमेकांपासून लांब राहणं पसंत केलं आहे.

आणखी वाचा : काखेतील केसांचा फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली….

आणखी वाचा : रस्त्यावरील मुलांना ५०० च्या नोटा वाटणे नेहा कक्करच्या आले अंगाशी, पाहा काय घडले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पलक आणि इब्राहिमचा एकत्र फिरतानाचा व्हिडीओ बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने शेअर केला. दोघेही शुक्रवारी डिनर डेटवर एकत्र गेल्याचे म्हटले जात होते. पण पलकने चेहरा लपवण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिला ट्रोल करण्यात आले.