scorecardresearch

महेश मांजरेकर यांची लेक सई करतेय प्रसिद्ध निर्मात्याच्या मुलाला डेट?

महेश मांजरेकर यांची मुलगी सई बॉलिवूडच्या प्रसिद्ध निर्मात्याच्या मुलाला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

saiee manjrekar, mahesh manjrekar daughter, sajid nadiadwala, subhan nadiadwala, saiee manjrekar boyfriend, सई मांजरेकर, महेश मांजरेकर, साजिद नाडियाडवाला, सुभान नाडियाडवाला
सोशल मीडियावर सक्रिय असणारी सई मांजरेकर सध्या तिच्या रिलेशनशिपच्या वृत्तामुळे चर्चेत आहे.

प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरनं अभिनेता सलमान खानच्या ‘दबंग’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसली होती. सोशल मीडियावर सक्रिय असणारी सई मांजरेकर सध्या तिच्या रिलेशनशिपच्या वृत्तामुळे चर्चेत आहे. सई मांजरेकर सध्या बॉलिवूडच्या प्रसिद्ध निर्मात्याच्या मुलाला डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

‘टाइम्स ऑफ इंडिया’नं दिलेल्या वृत्तानुसार सई मांजरेकर बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता, साजिद नाडियाडवाला यांचा मुलगा सुभान नाडियाडवाला याला डेट करत आहे. या दोघांनाही अनेकदा लंच आणि डिनर डेटसाठी जाताना स्पॉट केलं गेलं आहे. पण दोघांनीही फोटोग्राफर्सना त्यांचे फोटो क्लिक न करण्याची विनंती केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नुकतंच या दोघांना एकत्र पाहिलं गेलं होतं. मात्र त्यांनी एकत्र फोटो क्लिक करण्यास नकार दिला. सुभाननं पॅपराजीला फोटोसाठी पोज दिली आणि नंतर तो त्याच्या कारमध्ये बसून निघून गेला. त्यानंतर सई तिच्या कारमधून निघाली. सई आणि सुभान यांनी अर्थातच त्याच्या नात्याबाबत कोणताही खुलासा अद्याप केलेला नाही. मात्र त्यांच्या वारंवार एकत्र दिसण्यावरून हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज लावला जात आहे.

दरम्यान सई मांजरेकरचा पहिला चित्रपट ‘दबंग ३’ प्रदर्शित झाल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी आपल्याला मुलीचा या चित्रपटातील अभिनय अजिबात आवडला नसल्याचं म्हटलं होतं. याशिवाय सईसोबत दिग्दर्शक म्हणून काम करण्याबाबत महेश मांजरेकर म्हणाले होते, ‘जर एखादी भूमिका तिच्यासाठी योग्य असेल, ज्या भूमिकेत मी तिच्याशिवाय दुसऱ्या कोणालाच पाहू शकत नाही किंवा एखादी अशी भूमिका जी तिच्या पर्सनॅलिटीशी मिळती- जुळती आहे. तर मी तिच्यासोबत नक्कीच काम करेन. पण फक्त ती माझी मुलगी आहे म्हणून मी कोणतीही भूमिका तिला देणार नाही.’

सई मांजरेकरच्या कामाबद्दल बोलायचं तर ती लवकरच ‘मेजर’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित आहे. याशिवाय सई सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. तिच्या पोस्ट सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असतात.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Is mahesh manjrekar daughter saiee dating sajid nadiadwala son subhan know the truth mrj

ताज्या बातम्या