Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding in Jamnagar: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. अंबानी कुटुंबाने या सोहळ्यासाठी पाहुण्यांची एकदम उत्तमरित्या सोय केली आहे. रिहाना, बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग अशा अनेक आंतरराष्ट्रीय पाहुण्यांनी या सोहळ्याची शोभा वाढवली.

१ मार्च ते ३ मार्च दरम्यान पार पडणाऱ्या या सोहळ्याचा आज दुसरा दिवस आहे. अंबानी कुटुंबातील सदस्य ते बॉलीवूड सेलिब्रिटीजपर्यंत सगळ्यांनीच या सोहळ्यासाठी डिझायनर कपड्यांची निवड करत फॅशन ट्रेंड फॉलो केले आहेत. दरम्यान, राधिकाच्या होणाऱ्या नणंदेचा दुसऱ्या दिवशीचा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…
Theft of gas from cooking cylinders Two arrested for doing illegal business
स्वयंपाकाच्या सिलिंडरमधून गॅस चोरी; पत्र्याच्या खोलीत बेकायदा व्यवसाय करणारे दोघे अटकेत

हेही वाचा… VIDEO: प्री-वेडिंग सोहळ्यात अनंत अंबानीच्या ‘त्या’ कृतीने पाणावले मुकेश अंबानींचे डोळे; व्हिडीओ व्हायरल

अनंत अंबानीची बहीण ईशा अंबानी पिरामलचा डिझायनर लूक नुकताच समोर आला आहे. अनैता श्रॉफ या फॅशन स्टायलिस्टने ईशाचे फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. यात ईशा काळ्या रंगाच्या नेट ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे. डायमंड ज्वेलरीसह तिने हा लूक पूर्ण केला आहे. मेसी बन, न्यूड लिप्स, ब्लॅक आयशॅडो असा मिनिमल आणि क्लासिक लूक ईशाने निवडला आहे.

ईशाच्या या फोटोजमधील विशेष गोष्ट म्हणजे ईशा तिच्या जुळ्या मुलांसह यात ट्विनींग करत दिसली आहे. चिमुकले आदित्य आणि क्रिष्णा या फोटोजमध्ये अगदी गोंडस दिसतायत. आदित्य आणि क्रिष्णाने मामाच्या प्री वेडिंगसाठी ट्रेंड फॉलो केला. आदित्यने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाचा सूट घातला आहे. यात आदित्य अगदी जेंटलमेन दिसत आहे. तर क्रिष्णाने काळ्या रंगाचा फ्रॉक आणि काळे बूट्स घातले आहेत. आई आणि मुलांचा हा त्रिकुट फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा… राधिका मर्चेंटने प्री-वेडिंग सोहळ्यात अमेरिकन अभिनेत्री ब्लेक लाइव्हलीचा लूक केला रिक्रिएट; चाहते म्हणाले, “हा ड्रेस…”

दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्याचा उद्या म्हणजेच ३ तारखेला शेवटचा दिवस आहे. माहितीनुसार, १२ जुलैला अनंत आणि राधिका यांचा मुंबईत शाही लग्नसोहळा पार पडणार आहे. गेल्या वर्षी १९ जानेवारीला अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा मोठ्या धुमधडाक्यात साखरपुडा झाला होता.