scorecardresearch

“माझं नाव घेतलं नाही ना…”, अनन्याच्या घरी फुलांचा बुके घेऊन गेल्यामुळे ईशान खट्टर झाला ट्रोल

ईशानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

“माझं नाव घेतलं नाही ना…”, अनन्याच्या घरी फुलांचा बुके घेऊन गेल्यामुळे ईशान खट्टर झाला ट्रोल
ईशानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Photo Credit : Varinder Chawla, Ananya Panday Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे गेल्या काही दिवसांपासून आर्यन खान ड्रग्स प्रकरणात चर्चेत आहे. गेल्या तीन दिवसांपासून अनन्याची चौकशी सुरु आहे. दरम्यान, या सगळ्यात अनन्याचा मित्र ईशान खट्टर तिला भेटायला आल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरेंद्र चावलाने शेअर केला आहे. या व्हिडीओत ईशान एका फुलांच्या स्टॉलवर फुलांचा गुच्छ घेताना दिसत आहे. त्यानंतर तो अनन्याच्या बिल्डिंगच्या बाहेर त्याची गाडी दिसली.

आणखी वाचा : “हिंदू धर्माच्या सणावेळीच ज्ञान का देता….” ; ‘त्या’ पोस्टमुळे रितेश देशमुख झाला ट्रोल

आणखी वाचा : “बिचाऱ्या मुलांवर दया करा…”, NCBच्या कारवाईनंतर राखी सावंतचं आर्यन खान आणि अनन्या पांडेला समर्थन

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी हेच खरं प्रेम असं म्हटलं आहे. तर काहींनी त्यांना ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, “फुलं देऊन हेच म्हणाला असेल की कृपया माझं नाव घेऊ नको.” दुसरा नेटकरी म्हणाला, “माझं नाव घेतलं नाही ना,” अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे.

आणखी वाचा : ‘या’ कारणामुळे शाहरुख आजही विसरला नाही चंकी पांडेचे ‘ते’ उपकार

अनन्या आणि ईशानने खाली पिली या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. बऱ्याचवेळा एकत्र फिरायला गेल्यापासून ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, त्या दोघांनी चांगले मित्र असल्याचे म्हटले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-10-2021 at 12:16 IST

संबंधित बातम्या