scorecardresearch

अनन्याशी ब्रेकअपच्या चर्चांवर इशान खट्टरने सोडलं मौन, म्हणाला “आशा करतो की आयुष्यभर…”

इशान खट्टर आणि अनन्या पांडेच्या ब्रेकअपची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती.

अनन्याशी ब्रेकअपच्या चर्चांवर इशान खट्टरने सोडलं मौन, म्हणाला “आशा करतो की आयुष्यभर…”
करण जोहरच्या या शोमध्ये इशान खट्टर त्याच्या ब्रेकअपबद्दल बिनधास्तपणे बोलला.

करण जोहरचा लोकप्रिय चॅट शो ‘कॉफी विथ करण ७’ चा नवा एपिसोड नुकताच प्रसारित झाला आहे. यावेळी करणच्या शोमध्ये ‘फोन भूत’ची स्टार कास्ट दिसली. हा नवा एपिसोड खूपच मजेदार असणार आहे. शो दरम्यान, तिन्ही कलाकारांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणानं भाष्य केलं. एकीकडे कतरिना कैफने तिच्या आणि विकीच्या लव्हस्टोरीचा खुलासा केला आहे. तर दुसरीकडे, सिद्धांत चतुर्वेदी आपल्या लव्ह लाइफबद्दल बोलताना थोडा लाजताना दिसला.

करण जोहरच्या या शोमध्ये इशान खट्टर त्याच्या ब्रेकअपबद्दल बिनधास्तपणे बोलला. शोमध्ये करण जोहरने इशानला, ‘तुझे ब्रेकअप झाले आहे का?’ असा प्रश्न विचारला होता. यावर अनन्याचे नाव न घेता इशान म्हणाला, “मी सध्या सिंगल आहे. मला आशा आहे की अनन्या आणि मी आयुष्यभर चांगले मित्र राहू.” ‘खली पीली’ चित्रपटाच्या सेटवर शूटिंगदरम्यान इशान आणि अनन्या यांच्यात जवळीक वाढू लागली होती. त्यानंतर दोघेही काही काळ एकमेकांना डेट करत होते.
आणखी वाचा- ‘बॉईज ३’च्या ‘चांद माथ्यावरी’ या गाण्याची सर्वत्र चर्चा, व्हिडीओही होतोय व्हायरल

दोघांना अनेकदा डेटींग अनेकदा एकत्र पाहिले गेले होते, पण दोघांनीही कधीही त्यांच्या नात्याची पुष्टी केली नव्हती. तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघे वेगळे झाले. त्यानंतरही त्यांनी या ब्रेकअपवर बोलणं टाळलं. कामाबद्दल बोलायचं तर, अनन्या पांडे अलिकडेच विजय देवरकोंडा सोबत ‘लायगर’ चित्रपटात दिसली होती. हा बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.

आणखी वाचा- इशान खट्टरने केलेलं कौतुक ऐकून करण जोहर म्हणाला, “माझ्याकडे त्या नजरेने कुणी बघतच नाही”

अनन्या पांडे या व्यतिरिक्त आयुष्मान खुरानासह ‘ड्रीम गर्ल २’ या चित्रपटात दिसणार आहे. तर इशान लवकरच ‘पिप्पा’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो ‘फोन भूत’मध्ये कतरिना कैफ आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासह स्क्रीन शेअर करणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या