ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर आर्यन खान मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये गजाआड आहे. आर्यन केसवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. 20 ऑक्टोबर रोजी मुंबई सत्र न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळत त्याला 30 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर शाहरुख खान आणि आर्यन खानचे वकील आर्यनला लवकरात लवकर जामीन मंजूर व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र पुढील तीन दिवसात म्हणजेच २९ ऑक्टोबर पर्यंत जर न्यायालयाने जामीन अर्जावर कोणताही निर्णय दिला नाही तर आर्यनला १५ नोव्हेंबर पर्यंत जेलमध्येच राहवं लागू शकतं.
जर आर्यन खानच्या जामीन अर्जावर येत्या तीन दिवसात निकाल जाहीर झाला नाही तर त्याला यंदाची दिवाळी कारावासातच साजरी करावी लागणार आहे. आर्यन खानला दिवाळीसाठी घरी जाता येणार नाही. एनडीपीएस न्यायालयाने 20 ऑक्टोबरला आर्यनचा जामीन फेटाळल्यानंतर त्याच दिवशी त्याच्या वकीलाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज म्हणजेच २६ ऑक्टोबरला सुनावणी पार पडणार आहे.
२९ ऑक्टोबरला कोर्टाचं कामकाज सुरु राहणार आहे. मात्र त्यानंतर ३० आणि ३१ ऑक्टोबरला शनिवार आणि रविवार असल्याने कोर्ट बंद असेल. तर १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या काळात दिवाळीच्या सुट्टीनिमित्ताने न्यायाधीश हजर नसतील. त्यामुळे आजच्या सुनावणीत किंवा येत्या ३ दिवसात आर्यनच्या जामीन अर्जाचा निकाल जाहीर न झाल्यास आर्यन खानला कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी घरी जाता येणार नाही. १५ नोव्हेंबरपर्यंत त्याला जेलमध्येच रहावं लागेल
आजच्या सुनावणीत आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला गेल्यास त्याला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागणार आहे. तसचं एनडीपीएस न्यायालयाप्रमाणे हायकोर्टहीकडून जामिनावरील निर्णय 15 नोव्हेंबरपर्यंत राखून ठेवला जाण्याची शक्यता आहे.