रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘जग्गा जासूस’चा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. रणबीरच्या चाहत्यांनी हा फोटो ट्विटरवर प्रसिद्ध केला आहे.
चित्रपटाच्या नावावरूनच हे दोघेही जासूसच्या भूमिकेत दिसतील हे तर तुम्हला कळलेच आहे. जासूस म्हणून भूमिका साकारताना त्यांना तसेच लूकही देण्यात आले आहेत. या चित्रपटात आपल्याला रणबीरचा १९ ते ४० असा प्रवास पाहायला मिळणार आहे. तो यात त्याच्या बेपत्ता वडिलांचा शोध घेताना दिसेल. यावर्षी ऑगस्टमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. ‘जग्गा जासूस’चे दिग्दर्शन अनुराग बसू करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jagga jasoos first look meet nerdy detectives ranbir kapoor and katrina kaif
First published on: 04-01-2016 at 15:42 IST