श्रावण महिन्याच्या वद्य अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला. दरवर्षी त्यांच्या जन्मोत्सवावर जन्माष्टमी साजरी केली जाते. आज (११ ऑगस्ट) श्रीकृष्ण जयंती साजरी केली जात आहे. अनेक ठिकाणी बाळकृष्णासाठी खास पाळणा सजवला जातो आणि त्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेऊन त्याची पूजा केली जाते. श्रीकृष्ण जयंतीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. या दंहीहंडीत खरी रंगत आणतात ती म्हणजे बॉलिवूडची गाणी. यंदा करोनाचे सावट असल्यामुळे दहीहंडी उत्सव महाराष्ट्रात साजरा होणार नाही. पण दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येणारी गाणी ऐकूण तुम्ही आनंद नक्कीच साजरा करु शकता.

१) गोविंदा आला रे आला :

गोविंदा आला रे आला हे गाणं शम्मी कपूर यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं.

२) मच गया शोर :

अमिताभ बच्चन आणि परवीन बाबी यांच्या खुद्दार या चित्रपटातील मच गया शोर हे गाणं दहीहंडी उत्सवात आणखी रंगत आणते.

३)  गो गो गोविंदा :

सोनाक्षी सिन्हा आणि प्रभुदेवा यांच्यावर चित्रित झालेलं गो गो गोविंदा गाणं

४) आला रे आला गोविंदा आला :

अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांच्या काला बाजार चित्रपटाती आला रे आला गोविंदा आला हे गाणं दहीहंडी उत्सवात गोविंदांचा आत्मविश्वास आणखी वाढवतो.

५) चांदी की डाल पर :

सलमान खान आणि राणी मुखर्जी यांच्या चित्रपटातील चांदी की डाल पर.. हे गाणं दहीहंडी उत्सवात वाजवलेच जाते.

६) हर तरफ है ये शोर :

संजय दत्तच्या वास्तव चित्रपटातील हर तरफ है ये शोर हे गाणं दहीहंडीच्या वेळी प्रत्येकाच्या ओठांवर असते.

७)शोर मच गया शोर :

1974 मध्ये आलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांच्या बदला चित्रपटातील हे गाणं चांगलेच प्रसिद्ध आहे. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत आणि किशोर कुमार यांचा आवाजातील हे गाणं लोकांच्या पसंतीस उतरले आहे.

८) राधे राधे :

अभिनेता आयुष्मान खुराना याच्या ‘ड्रिम गर्ल’ सिनेमातील राधे राधे हे गाणं जन्माष्टमीत एक वेगळीच रंगत आणतं.

९) मैय्या यशोदा ये तेरा कन्हैय्य :

‘हम साथ साथ है’ चित्रपटातील ‘मैय्या यशोदा ये तेरा कन्हैय्या’ हे गाणं चांगलंच प्रसिद्ध आहे. अभिनेत्री करिश्मा कपूर, सोनाली बेंद्रे आणि तब्बू यांनी या गाण्यात सुंदर नृत्य केलं आहे.

१०) राधा कैसे ना जले

लगान या सिनेमात अभिनेता आमिर खान आणि ग्रेसी सिंग यांच्यावर चित्रित केलेले हे गाणं जन्माष्टमीत तुम्ही ऐकू शकता. हे गाणं उदित नारायण आणि आशा भोसले यांनी गायले आहे.